अन्‍न व औषध प्रशासनाकडे नाहीत रेमडेसिविर इंजेक्‍शन! गर्दी करू नका!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. रुग्णांना लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन, फॅबीप्ल्युव टॅबलेट व इतर तत्सम औषधीकरिता हॉस्पिटलमधून सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, बुलडाणा या कार्यालयात संपर्क साधण्यासाठी कळविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार पेशंटचे नातेवाईक हे या कार्यालयात येऊन गर्दी करतात. रेमडेसिविर इंजेक्शनबाबत वारंवार विचारणा करत असतात. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचे रुग्‍ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. रुग्‍णांना लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन, फॅबीप्ल्युव टॅबलेट व इतर तत्सम औषधीकरिता हॉस्पिटलमधून सहायक आयुक्त, अन्‍न व औषध प्रशासन, बुलडाणा या कार्यालयात संपर्क साधण्यासाठी कळविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार पेशंटचे नातेवाईक हे या कार्यालयात येऊन गर्दी करतात. रेमडेसिविर इंजेक्शनबाबत वारंवार विचारणा करत असतात. रेमडेसिविर इंजेक्शन या कार्यालयामार्फत वितरित केले जात नसून, ते घाऊक विक्रेत्‍यांकडे प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्‍या निर्देशानुसार घाऊक विक्रेत्याकडे किंवा किरकोळ विक्रेत्याकडे प्राप्त झाल्यानंतर अधिकृत कोविड सेंटरचे बाजूला असलेल्या मेडीकल दुकानांना उर्वरित साठा वितरीत करण्यात येत असतो. रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या संदर्भात कृपया या कार्यालयात येऊन गर्दी करू नये. रुग्ण अॅडमिट असलेल्या अधिकृत कोविड सेंटरचे बाजूला असलेल्या मेडीकल दुकानांवर संपर्क करावा व तेथे साठा उपलब्ध असल्यास इंजेक्शन प्राप्त करून घ्यावेत. तसेच अत्यावश्यक कामासाठी जी. के. वसावे अन्न सुरक्षा अधिकारी 9420440281, आर. डी सोळंके, अत्र सुरक्षा अधिकारी 9975388495, जी. पी. घिरके औषध निरीक्षक 9850150687, मु. ज. खुर्द रोखपाल 9922899958, अ. मोरे, लिपीक टंकलेखक 9561135825 व ज.म. झोपे, वरिष्ठ लिपीक यांच्या 7720045085 क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.