अपघातात मरण पावलेला पती मागितला परत..!; शेगावमधील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तुझ्या नवऱ्याने माझ्या पतीला सोबत नेल्याने अपघातात मरण पावला. माझ्या पतीला परत आणून दे असे म्हणून विद्या पहुरकर या महिलेला मारहाण करण्यात आली. शेगाव ग्रामीण पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विद्या संदीप पहुरकर यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे पती संदीप पहुरकरसोबत सुनील फुलकर …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तुझ्या नवऱ्याने माझ्या पतीला सोबत नेल्याने अपघातात मरण पावला. माझ्या पतीला परत आणून दे असे म्हणून विद्या पहुरकर या महिलेला मारहाण करण्यात आली. शेगाव ग्रामीण पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विद्या संदीप पहुरकर यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे.  त्‍यांचे पती संदीप पहुरकरसोबत सुनील फुलकर हा मोटारसायकलवर जात असताना चार महिन्यांपूर्वी पाळोदी ते अडसूळ दरम्यान मागून येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलस्वाराने धडक दिली. या अपघातात सुनील फुलकर गंभीर जखमी होऊन मरण पावले होते. 22 मार्चला मृतकाची  पत्नी नंदा सुनील फुलकर हिच्यासह छाया नंदू बांगर, आकाश नंदू बांगर, गोपाल फुलकर आणि गोपाळ फुलकर यांचा मुलगा असे पाच जण 22 मार्च रोजी दुपारी २ च्‍या सुमारास विद्याच्‍या घरी आले. नंदा फुलकर म्‍हणाली, की माझ्या पतीला तुझ्या पतीने नेले होते. त्यांना परत आणून दे, असे बोलून विद्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डोक्याचे केस सोडून जीवे मारण्याची धमकी देत शिविगाळ केली. तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक गुलाबराव अगडते करीत आहेत.