अपहरणाची ऑडिओ क्‍लिप पाठवून तिचे प्रियकरासोबत सातफेरे!; शेगाव पोलिसांनी सत्‍य आणले समोर

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रियकराशी विवाह उरकून नातेवाइकांच्या भीतीपोटी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव तरुणीने केल्याचा प्रकार शेगावमध्ये समोर आला आहे. विवाहाचे स्थळ अकोट पोलीस ठाणे हद्दीत असल्याने तरुणीसह तिच्या प्रियकराला शेगाव पोलिसांनी अकोट पोलिसांच्या ताब्यात दिले.झाले असे, की शेगाव येथे आपल्या बहिणीकडे दर्यापूर तालुक्यातील वडद बुद्रूक येथील 22 वर्षीय तरुणी आली होती. 23 फेब्रुवारीला अकोट …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः प्रियकराशी विवाह उरकून नातेवाइकांच्‍या भीतीपोटी स्‍वतःच्‍याच अपहरणाचा बनाव तरुणीने केल्‍याचा प्रकार शेगावमध्ये समोर आला आहे. विवाहाचे स्‍थळ अकोट पोलीस ठाणे हद्दीत असल्याने तरुणीसह तिच्‍या प्रियकराला शेगाव पोलिसांनी अकोट पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले.
झाले असे, की शेगाव येथे आपल्या बहिणीकडे दर्यापूर तालुक्‍यातील वडद बुद्रूक येथील 22 वर्षीय तरुणी आली होती. 23 फेब्रुवारीला अकोट येथे कामानिमित्त जात असल्याचे सांगून ती बहिणीच्‍या घरून बाहेर पडली. त्‍यानंतर ती परतलीच नाही. तिच्‍याशी कोणताच संपर्क होत नसल्याने अखेर शेगाव शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देण्यात आली. ठाणेदार संतोष ताले यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ श्री. सोनोने यांच्‍या पथकाने तिचा तपास सुरू केला. मोबाइल लोकेशन तपासले असता ती पथ्रोट पोलीस ठाण्याच्‍या हद्दीत मिळून आली. तिला शेगाव पोलीस ठाण्यात आणून जबाब नोंदविण्यात आला. तेव्‍हा तिने प्रियकराशी विवाह केल्याचे सांगून नातेवाइकांच्‍या भीतीमुळे अपहरणाचा बनाव केल्याचे सांगितले. तशी ऑडिओ क्‍लिप तिनेच नातेवाइकाडे पाठवल्‍याचेही सांगितले. सध्या दोघांनाही अकोट पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले आहे.