अपेक्षा नसताना हाती लागले घबाड; चोरट्याला आला हार्टअ‍ॅटॅक

चोरीत सापडलेले लाखो रुपये घातले रुग्णालयाच्या बिलात बिजनौर : चांगल्या मार्गानी कमावलेला पैसा सत्कारणी लागतो. तर वाईट मार्गांनी कमावलेला पैसा हा त्याच मार्गाने गमवावा लागतो. उत्तर प्रदेशात दोन चोरट्यांना याचा चांगलाच अनुभव नुकताच आला. तेथे दोन चोरट्यांनी एका शोरूममध्ये डल्ला मारला. तेथे त्यांना अपेक्षा नसताना सात लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे घबाड हाती लागले. पण एवढी …
 

चोरीत सापडलेले लाखो रुपये घातले रुग्णालयाच्या बिलात

बिजनौर : चांगल्या मार्गानी कमावलेला पैसा सत्कारणी लागतो. तर वाईट मार्गांनी कमावलेला पैसा हा त्याच मार्गाने गमवावा लागतो. उत्तर प्रदेशात दोन चोरट्यांना याचा चांगलाच अनुभव नुकताच आला. तेथे दोन चोरट्यांनी एका शोरूममध्ये डल्ला मारला. तेथे त्यांना अपेक्षा नसताना सात लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे घबाड हाती लागले. पण एवढी मोठी रक्कम पाहून एका चोरट्याला चक्क हार्टअ‍ॅटॅक आला आणि त्याच्या वाट्याला आलेली रक्कम त्याला हॉस्पिटलच्या बिलात खर्च करावी लागली आहे. तर दुसर्‍याने त्याचा वाटा जुगारात हरला. आता हे दोन्ही चोर तुुरंगाची हवा खात आहेत.
बिजनौर येथे कोतवाली ठाण्याअंतर्गत पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली. त्याची चौकशी केली असता वेगळाच प्रकार समोर आला. त्याआधारे आणखी एक चोरटा पोलिसांच्या गळाला लागला. त्या दोघांनी मिळून फेब्रुवारी महिन्यात एका नवाब हैदर यांच्या पब्लिक सर्व्हिस सेंटरमध्ये चोरी केली होती. हैदर यांनी पोलिस ठाण्यात त्यावेळी ७ लाखांची रक्कम चोरला गेल्याची तक्रार दाखल केली होती. तपासात ही चोरी पकडलेल्या दोन चोरांनी केल्याचे स्पष्ट झाले. बिजनौरचे पोलीस अधीक्षक धर्मवीरसिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी ३० वर्षे वयोगटाच्या अली व
एजाज या दोन चोरट्यांना पकडले. त्यांच्या चौकशीतून असे समजले की, सर्व्हिस सेंटरमध्ये चोरी ही त्यांनपीच केली होती. तेथे दहा-पाच हजार मिळतील, अशी अपेक्षा असताना अनपेक्षितरित्या त्या चोरट्यांच्याहाती सात लाखांचे घबाड लागले. ही रक्कम त्यांनी अर्धी-अर्धी वाटून घेतली. एवढी मोठी रक्कम पाहून एजाजलाचक्क हार्टअ‍ॅटॅक आला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. चोरीत मिळालेली अर्धीअधिक रक्कम बिलात गेली.तर नौशादने त्याचा वाटा जुगारात गमावला. आता ते दोघे पुन्हा नव्या चोरीच्या तयारीत होते. त्याआधीच ते पोलिसांच्या गळाला लागले. त्यांच्याकडून पोलिसांनी साडेतीन लाखांची रोकड व पिस्तूल जप्त केले.अपेक्षा नसताना हाती लागले घबाड; चोरट्याला आला हार्टअ‍ॅटॅक