अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांची कोरोनावर मात, 9 दिवस दिला लढा! यवतमाळात झाले पॉझिटिव्ह, बुलडाण्यात निगेटिव्ह!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्याचे तत्कालिन तथा सध्या यवतमाळ येथे अप्पर जिल्हाधिकारी पदी कार्यरत प्रमोदसिंह दुबे यांना आज, 28 एप्रिलला बुलडाणा येथील कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेले 9 दिवस त्यांनी कोरोनाशी झुंज देत त्यावर मात केली. यवतमाळ येथे कार्यरत असताना कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी यवतमाळऐवजी बुलडाणा येथे उपचार घेणे पसंत …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाण्याचे तत्कालिन तथा सध्या यवतमाळ  येथे अप्पर जिल्हाधिकारी पदी कार्यरत प्रमोदसिंह दुबे यांना आज, 28 एप्रिलला बुलडाणा येथील कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेले 9 दिवस त्यांनी कोरोनाशी झुंज देत त्यावर मात केली.

यवतमाळ येथे कार्यरत असताना कोरोना पॉझिटिव्‍ह आल्यानंतर त्यांनी  यवतमाळऐवजी बुलडाणा येथे उपचार घेणे पसंत केले. महागड्या रुग्णालयाऐवजी ते बुलडाणा येथील महिला रुग्णालयातील कोविड रुग्णालयात भरती झाले. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रेमडेसिव्हिरचे 7 डोज देण्यात आले. आज 27 एप्रिलला त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी सामान्य झाल्याबे नॉर्मल आल्याने त्यांना रुग्णालयातून आज दुपारी 12 वाजता डिस्चार्ज देण्यात आला.