अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्‍या कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले!; 4 टिप्पर पकडले, 9 लाखांचा दंड

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अप्पर जिल्हाधिकारी धनराज गोगटे यांनी काल, 4 जून रोजी रात्री आठच्या सुमारास सावरगाव तेली (ता. लोणार) शिवारात केलेल्या धडक कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहेत. श्री. गोगटे यांच्या पथकाने 4 टिप्पर जप्त केले. त्यांच्याकडून तब्बल 9 लाख 42 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सावरगाव तेली- भुमराळा घाटातून सर्रास अवैधरित्या रेती …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अप्पर जिल्हाधिकारी धनराज गोगटे यांनी काल, 4 जून रोजी रात्री आठच्‍या सुमारास सावरगाव तेली (ता. लोणार) शिवारात केलेल्या धडक कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहेत. श्री. गोगटे यांच्‍या पथकाने 4 टिप्पर जप्‍त केले. त्‍यांच्‍याकडून तब्‍बल 9 लाख 42 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सावरगाव तेली- भुमराळा घाटातून सर्रास अवैधरित्या रेती उत्‍खनन आणि वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्‍या. त्‍यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या ताफ्‍यासह या रेतीघाटांवर धडक दिली. यावेळी विनापावती रेती वाहतूक करणारे 4 टिप्पर (क्रमांक एमएच 38 डब्‍ल्‍यू 9313, एमएच 12 क्‍युजी 7747, एमएच 28 एबी 8275, एमएच 20 जीटी 1427) पकडण्यात आले. थेट अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन कारवाई केल्याने रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहेत.