अबब… जिल्ह्यात पावणेतीनशे दुचाकी अन्‌ एक ऑटो बेवारस!; “ओळख पटवा अन्‌ घेऊन जा’

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना बेवारस स्थितीत मिळून आलेले 275 दुचाकी व एक तीन चाकी ऑटो जप्त करण्यात आली आहे. सर्व बेवारस वाहने संकलित करून बुलडाणा शहरातील पोलीस मुख्यालयाच्या आवारात लावलेली आहेत. या वाहनांवर कुणाचा हक्क असेल त्यांनी सात दिवसांत पोलीस मुख्यालयात कागदपत्रांसह यावे. पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेवर कुणीही …
 
अबब… जिल्ह्यात पावणेतीनशे दुचाकी अन्‌ एक ऑटो बेवारस!; “ओळख पटवा अन्‌ घेऊन जा’

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना बेवारस स्थितीत मिळून आलेले 275 दुचाकी व एक तीन चाकी ऑटो जप्त करण्यात आली आहे. सर्व बेवारस वाहने संकलित करून बुलडाणा शहरातील पोलीस मुख्यालयाच्‍या आवारात लावलेली आहेत. या वाहनांवर कुणाचा हक्क असेल त्यांनी सात दिवसांत पोलीस मुख्यालयात कागदपत्रांसह यावे. पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आलेल्‍या मालमत्तेवर कुणीही मालकी हक्क प्रस्थापित केलेला नाही तर जप्त मालमत्तेची निर्गती करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांचे वाहन चोरी झालेले, हरविलेल्‍याबाबत तक्रारी असल्यास त्यांनी बुलडाणा जिल्हा पोलीस दलाच्‍या www.buldhanapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध आलेल्या वाहनांच्‍या यादीची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक गिरीष ताथोड यांनी केले आहे.