अबब… वाहतूक नियम मोडला म्‍हणून दीड कोटीचा दंड!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दंड आणि कारवाईला न जुमानता अनेक जण रस्ता आपलीच प्रॉपर्टी असल्यासारखे वाहन चालवत असतात. यामुळे अपघाताला कारणीभूत ठरून स्वतःचेही नुकसान करून घेतात आणि दुसऱ्याच्याही जिवावर उठतात. अशा महाभागांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांच्या जिल्हा वाहतूक शाखेने वर्षभरात तब्बल दीड लाख कारवाया केल्याचे बुलडाणा लाइव्हच्या समोर आले आहे. यातून तब्बल …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दंड आणि कारवाईला न जुमानता अनेक जण रस्‍ता आपलीच प्रॉपर्टी असल्यासारखे वाहन चालवत असतात. यामुळे अपघाताला कारणीभूत ठरून स्‍वतःचेही नुकसान करून घेतात आणि दुसऱ्याच्‍याही जिवावर उठतात. अशा महाभागांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांच्‍या जिल्‍हा वाहतूक शाखेने वर्षभरात तब्‍बल दीड लाख कारवाया केल्‍याचे बुलडाणा लाइव्‍हच्‍या समोर आले आहे. यातून तब्‍बल सव्वा कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल करण्यात आला.

वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनधारकांवर सातत्याने कारवाई केल्याने अपघातांचे प्रमाण घटले. अपघात रोखण्यासाठी बेशिस्त वाहनधारकांची गय करू नका, अशी सूचनाच कर्तव्‍यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया व जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी पोलिसांना केली होती. जानेवारी 2020 ते मार्च 2020 या तीन महिन्यांच्या कालावधीत 144 अपघातांमध्ये 76 जणांचा मृत्यू झाला होता, तर यावर्षी जानेवारी 2021 ते मार्च 2021 या कालावधीत 124 अपघातांमध्ये 63 जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल 2020 ते मार्च 2021 या आर्थिक वर्षात जिल्हाभरात 1 लाख 58 हजार 804 केसेस करण्यात आल्या. यातून तब्बल 1 कोटी 14 लाख 13 हजार 50 रुपयांचा विक्रमी दंड वसुल करण्यात आला आहे.

अशी कारवाई असा दंड…

  • दुचाकीवर ट्रिपल सीट जाणाऱ्यांवर कारवाई करताना एकूण 4482 केसेस झाल्‍या. त्‍यांच्‍याकडून 2 लाख 63 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
  • सीट बेल्ट न लावल्याच्या 9844 केसेसमध्ये 15 लाख 53 हजार 800 रुपये दंड वसुलण्यात आला.
  • मर्यादित गतीपेक्षा अधिक गतीने (ओव्हर स्पीड ) वाहने चालवल्या प्रकरणी 3666 केसेसमध्ये 5 लाख 14 हजार दंड वसूल करण्यात आला.
  • अवैध प्रवासी वाहतुकीच्‍या 1409 केसेस कोर्टात दाखल केल्या असून, त्यांना कोर्टाकडून दंड ठोठावण्यात येणार आहे.
  • अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला दिल्याप्रकरणी 14 केसेस दाखल करून त्यांच्या पालकांना 14 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
  • वाहन चालवताना मोबाइलवर बोलण्याची 550 प्रकरणे दाखल करून 1 लाख 58 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
  • विना लायसन्स वाहन चालवण्याची 1068 प्रकरणे दाखल असून, 8 लाख 34 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.