अभिनेते अनुपम खेर बुलडाण्यातील कोरोना रुग्‍णांच्‍या मदतीला… मदतसाहित्‍य पाठवले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अभिनेते अनुपम खेर कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले असून, प्रोजेक्ट हिल इंडिया या त्यांच्या उपक्रमातून बुलडाणा जिल्ह्यासाठी 3 ऑक्सिजन कॉन्स्टंट्रेटर्स (oxygen concentrators) व 3 बिपॅप मशीन (BiPAP machines) पुरविण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या ग्लोबल कॅन्सर फाऊंडेशन आणि भारत फोर्जसोबत मिळून खेर हे काम करत आहेत. त्यातूनच बुलडाणा येथील कोविड रुग्णालयाला ही मदत मिळाली …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अभिनेते अनुपम खेर कोरोनाग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी सरसावले असून, प्रोजेक्‍ट हिल इंडिया या त्‍यांच्‍या उपक्रमातून बुलडाणा जिल्ह्यासाठी 3 ऑक्सिजन कॉन्‍स्‍टंट्रेटर्स (oxygen concentrators) व 3 बिपॅप मशीन (BiPAP machines) पुरविण्यात आल्या आहेत.

अमेरिकेच्‍या ग्‍लोबल कॅन्‍सर फाऊंडेशन आणि भारत फोर्जसोबत मिळून खेर हे काम करत आहेत. त्‍यातूनच बुलडाणा येथील कोविड रुग्‍णालयाला ही मदत मिळाली आहे. यापूर्वी पुणे येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्‍ट्रीजचे व्‍यवस्‍थापक प्रशांत गिरबाने यांनी 50 ऑक्सिजन कॉन्‍स्‍टंट्रेटर्स व 5 बिपॅप मशीन कोविड रुग्‍णालयाला पाठवल्या आहेत. दानशूर व्‍यक्‍तींच्‍या सहकार्याने सरकारी यंत्रणेलाही रुग्‍णांच्‍या सेवेतील अडचणी दूर करता शक्‍य होत आहे. खेर यांनी पाठविलेली मदत धर्मवीर आखाड्याने अध्यक्ष मृत्‍यूंजय गायकवाड यांच्‍या हस्‍ते कोविड रुग्‍णालयाला देण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्‍सक डॉ. प्रशांत पाटील, डॉ. वासेकर, डॉ. भुसारी, डॉ. अर्शिद, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, ओमसिंह राजपूत, दीपक तुपकर, जीवन उबरहंडे, सचिन परांडे, श्रीकृष्ण शिंदे, अनुप श्रीवास्‍तव, गोलू सूर्यवंशी, ज्ञानेश्वर खांडवे आदी उपस्‍थित होते.