अमडापूर बसस्थानकाचे काम तातडीने पूर्ण करा; आ. श्वेताताई महाले यांची सूचना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनेक दिवसांपासून रखडलेल्या अमडापूर बसस्थानकाचे काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी अमडापूर बसस्थानकाबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत केली आहे. १० ऑगस्टला घेतलेल्या या आढावा बैठकीत एसटी महामंडळाचे विभागीय अभियंता ए. बी. नाईक, श्री. बंगाळे यांची उपस्थिती होती. अमडापूर हे नीम शहर असून या शहराला अनेक खेडेपाडे …
 
अमडापूर बसस्थानकाचे काम तातडीने पूर्ण करा; आ. श्वेताताई महाले यांची सूचना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनेक दिवसांपासून रखडलेल्या अमडापूर बसस्थानकाचे काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी अमडापूर बसस्थानकाबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत केली आहे.

१० ऑगस्‍टला घेतलेल्या या आढावा बैठकीत एसटी महामंडळाचे विभागीय अभियंता ए. बी. नाईक, श्री. बंगाळे यांची उपस्थिती होती. अमडापूर हे नीम शहर असून या शहराला अनेक खेडेपाडे संलग्न आहेत. अमडापूर येथे मोठी बाजारपेठ असल्याने त्या ठिकाणी नेहमी गर्दी असते. त्यामुळे आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नातून २०१७ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अमडापूर येथे १ कोटी १४ लक्ष रुपये किंमतीच्या अत्याधुनिक बसस्थानक बनविण्यासाठी मान्यता मिळविली होती.

त्याचवेळी बसस्थानकाच्‍या बांधकामाचा कामाचा शुभारंभही झाला होता. बसस्थानकाचे जवळपास ६० टक्‍के काम पूर्ण झाले होते. परंतु सरकार बदलले आणि बसस्थानकाचे काम रखडले. त्यामुळे आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी यासाठी तारांकित प्रश्न, लक्षवेधी, कपात सूचना या सांसदीय आयुद्धांमार्फत सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे रखडलेले अमडापूर बसस्थानकाचे काम काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. बसस्थानकाच्या नवीन इमारतीत एकूण ६ फलाट आहेत. चालक, वाहक विश्रांतीगृह, महिला विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, स्थानकप्रमुख कक्ष, चौकशी कक्ष उपहारगृह, प्रवाशाकरिता प्रसाधनगृह, प्रतीक्षागृह, आसन व्यवस्था, आरक्षण कक्ष, बसस्थानकावर स्वतंत्र इन व आऊट गेट आदी कामांचा समावेश आहे. आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी काम सुरू करण्यात पुढाकार घेतल्याने आणि युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने येत्या दसऱ्यापर्यंत नवीन अमडापूर बसस्‍थानकातून बसेसची येजा सुरू होण्याची आशा वाढली आहे.