अमर कलेक्‍शनमधून एकेक करत निघाले तब्‍बल 30 ग्राहक…!; कारवाई करणारे पथकही हबकले!!, बुलडाण्यातील प्रकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत. यातून केवळ अत्यावश्यक सेवांनाच सूट आहे. तरीही बाजारपेठेतील अमर कलेक्शनच्या मालकाने ‘चुपके चुपके’ दुकान सुरूच ठेवले. ही बाब नगरपालिकेच्या पथकाला मिळताच त्यांनी पोलिसांसह त्या ठिकाणी धाव घेतली. दुकानात धडकताच जेव्हा ग्राहक बाहेर काढणे पथकाने सुरू केले तेव्हा तब्बल 30 …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत. यातून केवळ अत्‍यावश्यक सेवांनाच सूट आहे. तरीही बाजारपेठेतील अमर कलेक्‍शनच्‍या मालकाने ‘चुपके चुपके’ दुकान सुरूच ठेवले. ही बाब नगरपालिकेच्‍या पथकाला मिळताच त्‍यांनी पोलिसांसह त्‍या ठिकाणी धाव घेतली. दुकानात धडकताच जेव्‍हा ग्राहक बाहेर काढणे पथकाने सुरू केले तेव्‍हा तब्‍बल 30 ग्राहक आढळले. त्‍यांच्‍यात ना सुरक्षित अंतर ना अनेकांच्‍या तोंडाला मास्‍क. पथकाने मग तब्‍बल 35 हजार रुपयांचा दंड दुकानमालकाला ठोठावला. ही कारवाई आज, 23 मे रोजी सकाळी 11 वाजता ही कारवाई करण्यात आली. कारवाई करणाऱ्या पथकात राजेश भालेराव, डिगंबर चाटे, जाकीर शेख लाल, पोलीस उपनिरिक्षक अमित जाधव, पोहेकाँ सुनील मौजे यांचा सहभाग होता. या कारवाईने चुपके चुपके दुकाने सुरूच ठेवणाऱ्या दुकानदारांत खळबळ उडाली आहे.