अयोद्ध्येतील श्रीराम मंदिरासाठी शेगावमध्ये निधी संकलन सुरू

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अयोद्ध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर बांधले जात असून, यासाठी देशभर निधी जमा केला जात आहे. आज, 7 जानेवारीला संतनगरी शेगावात निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन व अभियानास प्रारंभ करण्यात आला. सकाळी 11 वाजता अग्रसेन चौकात हा सोहळा भागवताचार्य, कारसेवक, ह.भ.प.रामकृष्ण महाराज ताकोते यांच्या हस्ते व विभाग संघचालक चित्तरंजन …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अयोद्ध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर बांधले जात असून, यासाठी देशभर निधी जमा केला जात आहे. आज, 7 जानेवारीला संतनगरी शेगावात निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन व अभियानास प्रारंभ करण्यात आला. सकाळी 11 वाजता अग्रसेन चौकात हा सोहळा भागवताचार्य, कारसेवक, ह.भ.प.रामकृष्ण महाराज ताकोते यांच्या हस्ते व विभाग संघचालक चित्तरंजन दास राठी, जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, शेगाव नगराध्यक्षा शकुंतलाताई बुच, तालुका संघचालक श्रीराम पुंडे, नगर संघचालक श्यामजी तेल्हारकर व निधी संकलन अभियान प्रांत प्रमुख चंद्रकांत घोराडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

प्रभू श्रीरामचंद्र प्रत्येक हिंदूच्या मनात आहेत आणि आज सर्वांची मान अभिमानाने उंचावेल, असे यावेळी श्री. ताकोते महाराज म्हणाले. कार्यक्रमाला माजी प्राचार्य श्री. देशमुख, गिरधर राठी, कीर्ती संघानी, प्रदीप सांगळे, रामकृष्ण विभुते, ओम पांडे, पांडुरंग बुच, सोनू मोहोड, मुकुंदा खेळकर, प्रवीण मोरखडे आदी श्रीराम भक्त उपस्थित होते. सूत्रसंचालन सोमेश कांबळे यांनी केले. प्रास्ताविक अ‍ॅड. अतुल देशमुख यांनी केले. वैयक्तिक गीत प्रफुल्ल देशमुख यांनी म्हटले. आभार विनोद लांजुळकर यांनी मानले.