अरेच्चा… घटस्फोटीत पत्नीकडून नवरोबाला मारहाण! खामगावमधील धक्कादायक घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घटस्फोटीत पत्नीने नवरोबाला चापटाबुक्क्यांनी, काठीने बेदम मारहाण केली. ही धक्कादायक घटना काल, १५ जुलैला सायंकाळी सहाच्या सुमारास खामगाव शहरातील रावणटेकडी घरकुल भागात घडली. श्रीकृष्ण चंद्रभान कासारकर (३१) या युवकाने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून आपल्यावर झालेल्या हल्ल्याची कहानी ऐकवली. सौ. सीमा चंदू गवळी असे त्याला मारहाण करणाऱ्या घटस्फोटीत …
 
अरेच्चा… घटस्फोटीत पत्नीकडून नवरोबाला मारहाण! खामगावमधील धक्कादायक घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घटस्‍फोटीत पत्‍नीने नवरोबाला चापटाबुक्‍क्यांनी, काठीने बेदम मारहाण केली. ही धक्‍कादायक घटना काल, १५ जुलैला सायंकाळी सहाच्‍या सुमारास खामगाव शहरातील रावणटेकडी घरकुल भागात घडली.

श्रीकृष्ण चंद्रभान कासारकर (३१) या युवकाने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून आपल्यावर झालेल्या हल्ल्याची कहानी ऐकवली. सौ. सीमा चंदू गवळी असे त्‍याला मारहाण करणाऱ्या घटस्‍फोटीत पत्‍नीचे नाव आहे. पत्‍नी सौ. सीमा चंदू गवळीच्या घरासमोर १५ जुलैला सायंकाळी जाऊन माझ्या मुलांना आवाज दिला असता तिने शिविगाळ करून चापटा बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. तिला या कृत्‍यात सौ. वंदना चंदू गवळी हिने मदत केली. श्रीकृष्ण कासारकर यांच्या फिर्यादीवरून व मेडिकल सर्टिफिकेटवरून दोन्ही महिलांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. पोहेकाँ चव्हाण करीत आहेत.