अरेच्चा… चांडोळची ग्रामपंचायत आंधळी झाली!

चांडोळ ता. बुलडाणा (प्रमोद गायकवाड) ः चांडोळ ग्रामपंचायतीसमोरच मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. नागरिकांनी वारंवार सांगूनही ग्रामपंचायत दूर्लक्ष करत असल्याने पाणी वाया जात आहे. नागरिकांना येण्या जाण्यासही अडचण होत आहे. सहा महिन्यांपासून हीच परिस्थिती असून, ग्रामपंचायतीला ती दिसत नसल्याने ग्रामपंचायत आंधळी झाल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे. साचलेल्या पाण्यामुळे लोक घसरून पडण्याची शक्यता निर्माण …
 

चांडोळ ता. बुलडाणा (प्रमोद गायकवाड) ः चांडोळ ग्रामपंचायतीसमोरच मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. नागरिकांनी वारंवार सांगूनही ग्रामपंचायत दूर्लक्ष करत असल्याने पाणी वाया जात आहे. नागरिकांना येण्या जाण्यासही अडचण होत आहे. सहा महिन्यांपासून हीच परिस्थिती असून, ग्रामपंचायतीला ती दिसत नसल्याने ग्रामपंचायत आंधळी झाल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.

साचलेल्या पाण्यामुळे लोक घसरून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरीही त्याकडे ग्रामपंचायतीला लक्ष द्यावेसे वाटले नाही, हे विशेष. ग्रामपंचायतीसमोर हे पाणी साचले आहे, तरीही त्यांना दिसत नाही का, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.