अरेच्‍चा… चिखलीत चक्क रावणाची पूजा!; चौकात घेतली अभिवादन सभा!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाविषयक नियमांमुळे रावन दहनाचे कार्यक्रम यंदा घेता आले नसले तरी दसऱ्याचे निमित्त साधून रावणाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम चिखलीत पार पडला आहे. शहरातील जयस्तंभ चौकात राजा रावण अभिवादन सभा घेण्यात आली. ही सभा घेतली ती रिपब्लिकन सेनेने. या घटनेची चर्चा सध्या चिखली शहरात होत आहे. आदिवासी संस्कृतीत रावणाला दैवत मानले जाते. …
 
अरेच्‍चा… चिखलीत चक्क रावणाची पूजा!; चौकात घेतली अभिवादन सभा!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाविषयक नियमांमुळे रावन दहनाचे कार्यक्रम यंदा घेता आले नसले तरी दसऱ्याचे निमित्त साधून रावणाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम चिखलीत पार पडला आहे. शहरातील जयस्तंभ चौकात राजा रावण अभिवादन सभा घेण्यात आली. ही सभा घेतली ती रिपब्लिकन सेनेने. या घटनेची चर्चा सध्या चिखली शहरात होत आहे.

आदिवासी संस्कृतीत रावणाला दैवत मानले जाते. त्याची विधिवत पूजा केली जाते. १९९१ साली मोतीरावण कंगाली यांनी रावण पूजेची सुरुवात केली, असे यावेळी सांगण्यात आले. सभेला जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई, शेख सलीम, ब्रह्मभाऊ साळवे, सुनील सोलंके, सत्य कुटे, विजय वाघ, संतोष सोलंके, सतिश पवार, सतिश इंगळे, शेख वसिम, संजय वाघ, गोपाळ जाधव, दीपक अवसरमोल, ॠषिकेश लहाने, वतन साळवे, रमेश राक्षे, गोपाल सपकाळ, शुभम चव्हाण, शिवम पंडीत, प्रदीप सोळंके, विजय वाधवाणी, पवन साळवे यांची उपस्‍थिती होती.