अरेच्‍चा… ट्रॅक्‍टरच गेले चोरी!; मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी शिवारातून चोरट्यांनी ट्रॅक्टरच चोरून नेल्याची घटना आज समोर आली आहे. ही चोरी 15 मे ते 16 मेच्या रात्रीदरम्यान घडल्याचे रामेश्वर आत्माराम शेवाळे (45, रा. विठ्ठलवाडी) यांनी मेहकर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ट्रॅक्टर- ट्रॉली (क्रमांक MH 28-T-4585, किंमत 1 लाख 20 हजार रुपये) विठ्ठलवाडी शिवारातील शेतात त्यांनी …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्‍यातील विठ्ठलवाडी शिवारातून चोरट्यांनी ट्रॅक्‍टरच चोरून नेल्याची घटना आज समोर आली आहे.  ही चोरी 15 मे ते 16 मेच्‍या रात्रीदरम्‍यान घडल्‍याचे रामेश्वर आत्माराम शेवाळे (45, रा. विठ्ठलवाडी) यांनी मेहकर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे. ट्रॅक्टर- ट्रॉली (क्रमांक MH 28-T-4585, किंमत 1 लाख 20 हजार रुपये) विठ्ठलवाडी शिवारातील शेतात त्‍यांनी उभे केले होते. चोरट्याने ते चोरून नेले. आजपर्यंत शोध घेऊनही ट्रॅक्‍टर न मिळाल्‍याने अखेर पोलिसांत तक्रार करण्यात आली.