अरेरे… इथे माणुसकी ओशाळली… थोड्याशा डिझेलसाठी धडपड अन् दुसरीकडे ट्रकमध्ये फसले होते जखमी!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः थोड्याशा लाभासाठी अनेक जण माणुसकी सोडतात. याची जाणीव अंचरवाडी-अंढेरा दरम्यान आज, 10 फेब्रुवारीला सकाळी झाली. अपघातग्रस्त ट्रकमधून डिझेल सांडण असताना ते भरून घेण्यासाठी अनेकांची धडपड चालू होती. दुसरीकडे ट्रककडे मात्र ट्रकमध्ये जखमी फसल्याचेही यात घाईत कुणाच्या गावीही नव्हते. त्यामुळे जखमींना तातडीने मदत मिळू शकली नाही.सध्या जालना-खामगाव सिमेंट रस्त्याचे काम सुरू …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः थोड्याशा लाभासाठी अनेक जण माणुसकी सोडतात. याची जाणीव अंचरवाडी-अंढेरा दरम्यान आज, 10 फेब्रुवारीला सकाळी झाली. अपघातग्रस्त ट्रकमधून डिझेल सांडण असताना ते भरून घेण्यासाठी अनेकांची धडपड चालू होती. दुसरीकडे ट्रककडे मात्र ट्रकमध्ये जखमी फसल्याचेही यात घाईत कुणाच्या गावीही नव्हते. त्यामुळे जखमींना तातडीने मदत मिळू शकली नाही.
सध्या जालना-खामगाव सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. अंचरवाडी-अंढेरा दरम्यान एकेरी वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. पुणे येथून नागपूरकडे जाणारा ट्रक उलटून दोघे गंभीर जखमी झाले. ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने डिझेल वाहू लागले. हे पाहून अनेकांनी ते डिझेल मिळविण्यासाठी धडपड सुरू केली. अपघातग्रस्तांना मदत करण्याचे सोडून थोड्याशा डिझेलसाठी माणुसकी हरवल्याचे याठिकाणी दिसून आले. यामुळे जखमी ट्रकमध्ये बराच वेळ अडकून पडले होते.