अरेव्‍वा… मुस्‍लिम भंगार विक्रेत्‍याने श्रीराम मंदिरासाठी दिले ११ हजार रुपये!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अयोद्ध्यात साकारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिरासाठी सध्या जिल्ह्यात निधी संकलन सुरू आहे. समाजातल्या शेवटच्या घटकाचेही या मंदिर उभारणीत योगदान असावे आणि हे राष्ट्रमंदिर उभे रहावे हा हेतू अभियानामागे आहे. जिल्ह्यात निधी संकलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चिखली येथील मुस्लिम भंगार विक्रेत्याने काल, 18 फेब्रुवारीला 11 हजार रुपयांचा निधी अभियान कार्यालयात आणून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अयोद्ध्यात साकारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिरासाठी सध्या जिल्ह्यात निधी संकलन सुरू आहे. समाजातल्या शेवटच्या घटकाचेही या मंदिर उभारणीत योगदान असावे आणि हे राष्ट्रमंदिर उभे रहावे हा हेतू अभियानामागे आहे. जिल्ह्यात निधी संकलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चिखली येथील मुस्लिम भंगार विक्रेत्याने काल, 18 फेब्रुवारीला 11 हजार रुपयांचा निधी अभियान कार्यालयात आणून दिला. शेख जावेद शेख नजीर यांचा चिखलीत भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. अभियानाची माहिती मिळताच त्यांनी स्वतःहून निधी कार्यालयात आणून दिल्याने समाजापुढे सद्‌भावनेचा नवा आदर्श समोर आला आहे.