अरे देवा… चोरट्यांनी विद्येचे मंदिरही नाही सोडले!; खामगाव तालुक्यात चार शाळा फोडल्या

खामगाव (भागवत राऊत) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत चोरट्यांनी हैदोस घातल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात चोरीच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. काल, २३ जुलैच्या रात्री खामगाव तालुक्यातील चार शाळा चोरट्यांनी फोडल्या. विहिगाव (ता. खामगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडीत साहित्याची नासधूस केली. आज, २४ जुलैला सकाळी या घटना समोर आल्या. खामगाव शहरातील …
 

खामगाव (भागवत राऊत) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत चोरट्यांनी हैदोस घातल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात चोरीच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. काल, २३ जुलैच्या रात्री खामगाव तालुक्यातील चार शाळा चोरट्यांनी फोडल्या. विहिगाव (ता. खामगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडीत साहित्याची नासधूस केली. आज, २४ जुलैला सकाळी या घटना समोर आल्या. खामगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद मराठी प्राथमिक शाळा व विहिगाव येथील जिल्हा परिषद शाळा, चैतन्य इंग्लिश मीडियम स्‍कूल, अहिल्यादेवी विद्यालय या शाळा फोडण्यात आल्या. शाळांच्या मुख्याध्यापकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत.