अर्थसंकल्पात बुलडाणा जिल्ह्याच्‍या तोंडाला पाने पुसली; आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांचा घणाघात

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सगळा महाराष्ट्र लुटायचा अन् केवळ पश्चिम महाराष्ट्र गोंजारायचा. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला या अर्थसंकल्पात काय मिळाले तर शून्य. आज सादर केलेला अर्थसंकल्प शून्य अर्थसंकल्प आहे असे म्हटले तरी वावगे होणार नसल्याची घणाघाती टीका आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी अर्थसंकल्पावर बोलताना केली आहे. आज जागतिक महिला दिन असताना महिलांसाठी ठोस …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सगळा महाराष्ट्र लुटायचा अन्‌ केवळ पश्चिम महाराष्ट्र गोंजारायचा. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला या अर्थसंकल्पात काय मिळाले तर शून्य. आज सादर केलेला अर्थसंकल्प शून्य अर्थसंकल्प आहे असे म्हटले तरी वावगे होणार नसल्याची घणाघाती टीका आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी अर्थसंकल्पावर बोलताना केली आहे. 

आज जागतिक महिला दिन असताना महिलांसाठी ठोस असे काहीही दिले नाही. जुन्याच योजनांचा उल्लेख करून नवा मुलामा चढवण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला गेला आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या तर अक्षरशः तोंडालाच पाने पुसली. खामगाव- जालना रेल्वे मार्गासाठी हिस्सा देण्याचे माझ्या तारांकित प्रश्नाला कबूल करूनही खामगाव जालना रेल्वे मार्ग करण्याबाबत उदासीनता दाखविली आहे. शेत पाणंद रस्त्यांसाठी भरीव तरतूद करण्याची मागणी असताना त्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नाही. राज्यात शासनाने, वैद्यकीय पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण केले असून, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये १०० विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीला प्रवेश देऊन नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. सार्वजनिक आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीची गरज ओळखून, शासनाने अमरावती, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग व नाशिक येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यास मान्यता दिली आहे. परंतु बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेची जागा, इमारत, मागणी या इतर सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत.  मुख्यमंत्री यांनी बुलडाणा येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देण्याची घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने राज्याचे आरोग्यमंत्री यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वीच बुलडाणा व जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता दिली असल्याचे म्हटले आहे. त्याच्या बातम्या पण आल्या .परंतु वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत इतर ठिकाणचा जरी उल्लेख असला तरी बुलडाणा व जालना जिल्ह्यासोबतच पश्चिम विदर्भ व पूर्व मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहे, अशी टीका आमदार श्वेताताई महाले यांनी केली आहे.