अर्ध्या रात्री खडकन वाजले, उठून पाहिले तर समोर तो..!; जळगाव जामोद येथील घटना

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खडकन वाजल्याने ते जागी झाले. उठून पाहिले तर समोर चोर… त्यांनी तातडीने आरडाओरड केल्याने तो पळून जाऊ लागला. शेजार्यांच्या मदतीने त्याला घरमालकाने पकडलेच. त्याला जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संतोष वसंता कोथळकार (24, रा. चौबारा ता. जळगाव जामोद) असे या संशयित चोराचे नाव आहे. …
 

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खडकन वाजल्याने ते जागी झाले. उठून पाहिले तर समोर चोर… त्यांनी तातडीने आरडाओरड केल्याने तो पळून जाऊ लागला. शेजार्‍यांच्या मदतीने त्याला घरमालकाने पकडलेच. त्याला जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

संतोष वसंता कोथळकार (24, रा. चौबारा ता. जळगाव जामोद) असे या संशयित चोराचे नाव आहे. अनिल गिरजापुरे यांनी तक्रार दिली की, 18 जानेवारी च्या रात्री ते, पत्नी- मुलांसह घराच्या दरवाजे, खिडक्या लावून झोपले होते. मध्यरात्री 12.30 च्या सुमारास दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कोणीतरी आत असल्याचा आवाज झाल्याने त्यांनी उठून पाहिले तर चोर दिसला. त्यांनी आरडाओरड केल्याने शेजारी वैभव गजानन जहागीरदार व अतुल कृष्णाजी उदार धावून आले. सर्वांनी मिळून चोराला पकडले व जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात दिले.