अल्पवयीन मुलाचा अल्पवयीन मुलीवर बलात्‍कार; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 17 वर्षीय मुलीवर गावातीलच 17 वर्षीय मुलाने बलात्कार केल्याची घटना काल, 17 एप्रिलला दुपारी चारच्या सुमारास जामोद (ता. जळगाव जामोद) शिवारात घडली.पीडित मुलीने तक्रार दिली, की अल्पवयीन मुलाने (वय 17 वर्षे 8 महिने, रा. जामोद) तिच्या मोबाइलवर फोन करून तिला टाॅवर जवळ ये. मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हटले. ती टाॅवरजवळ …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः 17 वर्षीय मुलीवर गावातीलच 17 वर्षीय मुलाने बलात्‍कार केल्याची घटना काल, 17 एप्रिलला दुपारी चारच्‍या सुमारास जामोद (ता. जळगाव जामोद) शिवारात घडली.पीडित मुलीने तक्रार दिली, की अल्पवयीन मुलाने (वय 17 वर्षे 8 महिने, रा. जामोद) तिच्या मोबाइलवर फोन करून तिला टाॅवर जवळ ये. मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हटले. ती टाॅवरजवळ गेली व त्‍याला विचारले की काय काम आहे. त्‍यावर त्‍या मुलाने तिला मोटरसायकलवर बसवून उमेश नामदेव कोथळकर (21, रा. जामोद) याच्या शेतातील झोपडीत नेले. तेथे अल्‍पवयीन मुलाने तिला हात धरून तिला जवळ ओढले. तेव्हा तिने आरडाओरडा केली. मुलाने तोंड दाबून तिच्‍यावर दोन वेळा बलात्‍कार केला. उमेश कोथळकरने झोपडीबाहेर रखवाली देऊन सहकार्य केले. या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. तपास एपीआय सतीश आडे करत आहेत.