अल्पवयीन मुलाला बुलडाणा बसस्‍थानकावर लुटले!; चोर चोर ओरडल्‍याने धावलेल्या नागरिकांनी तीनपैकी एका चोराला पकडून बेदम चोपले!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बसस्थानक परिसरात रिक्षाचालकाला लुटल्याची घटना विस्मृतीत जात नाही तोच आणखी एक तशाच स्वरुपाची घटना १४ सप्टेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास समोर आली आहे. बसस्थानकासमोर तिघांनी १७ वर्षीय मुलाला अडवून लुटले. पैसे न मिळाल्याने त्याचा ८ हजार रुपयांचा मोबाइल घेऊन ते पसार झाले. चोर चोर असे ओरडल्याने त्याच्या मदतीसाठी नागरिक धावले. नागरिकांनी …
 
अल्पवयीन मुलाला बुलडाणा बसस्‍थानकावर लुटले!; चोर चोर ओरडल्‍याने धावलेल्या नागरिकांनी तीनपैकी एका चोराला पकडून बेदम चोपले!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बसस्‍थानक परिसरात रिक्षाचालकाला लुटल्याची घटना विस्मृतीत जात नाही तोच आणखी एक तशाच स्वरुपाची घटना १४ सप्‍टेंबरच्या रात्री साडेआठच्‍या सुमारास समोर आली आहे. बसस्‍थानकासमोर तिघांनी १७ वर्षीय मुलाला अडवून लुटले. पैसे न मिळाल्याने त्‍याचा ८ हजार रुपयांचा मोबाइल घेऊन ते पसार झाले. चोर चोर असे ओरडल्‍याने त्‍याच्या मदतीसाठी नागरिक धावले. नागरिकांनी एका लुटारूला पकडले. पोलिसांनी या चोरट्याची चौकशी केली असता त्‍याने त्‍याच्‍या दोन साथीदारांचीही नावे सांगितली. तिन्‍ही चोरट्यांविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

बादल बाळू चव्हाण (१७, रा. पळसखेड नाईक हल्ली मुक्काम मच्छी ले आऊट, बुलडाणा) या मुलाने या प्रकरणात तक्रार दिली. विशाल सुरेश पवार (रा. शिरपूर), विनोद बरडे, भिका ठाकरे दोघे रा. भिलवाडा, बुलडाणा) अशी आरोपींची नावे आहेत. बादल हा पळसखेड नाइकचा मूळचा रहिवासी असून, बुलडाण्याच्‍या मच्छी ले आऊटमध्ये आई- वडील, भावासह राहतो. १४ सप्‍टेंबरला रात्री घरून जेवण करून साडेआठच्‍या सुमारास बसस्‍थानकाजवळील संगमचाैकाकडे पायी चालत येत असताना बसस्‍थानकासमोर अचानक त्‍याला तिघांनी पकडले. एकाने त्‍याचा गळा पकडला व पैशांची मागणी केली. पैसे नाहीत म्‍हटल्‍यावर त्‍याला मारहाण करायला सुरुवात केली.

एकाने त्‍याच्‍या पँटच्या खिशात हात घालून रेड मी कंपनीचा मोबाइल हिसकावला. नंतर तिघे पळून जाऊ लागले. त्‍याचवेळी बादलने चोर चोर अशी आरडाओरड केल्याने रस्‍त्‍यावरून जाणाऱ्या दोन व्‍यक्‍तींनी त्यांचा पाठलाग केला. बादलही लुटारूंच्‍या मागे पळाला. लुटारू तानाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने पळाले. गोंधळ आणि आरडाओरड केल्याने बरेच लोक जमा झाले. त्‍यांनी तिघांपैकी एका लुटारूला पकडून बेदम चोपले. पोलिसांनाही कुणीतरी कळवल्याने तेही घटनास्‍थळी आले. त्‍यांनी लुटारूला त्‍याचे नाव विचारले असता त्‍याने विशाल सुरेश पवार (रा. शिरपूर) असे सांगितले. साथीदारांबद्दल कसून चौकशी केली असता त्‍याने अन्य दोघांची नावे सांगितली. त्‍यावरून त्‍याच्‍यासह विनोद बरडे व भिका ठाकरे या दोघांविरुद्धही पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला. त्‍या दोघांचा शोध घेतला जात आहे.