अल्पवयीन मुलीचे अपहरण!; शेगावमध्ये खळबळ

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दहावीचे पेपर सबमिट करण्यासाठी गेलेली 15 वर्षीय मुलगी घरी परतलीच नाही. तिच्या आईने शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून तिला कुणीतरी पळवले असल्याचा संशय व्यक्त करत तक्रार दिली आहे. बालाजी फैल भागात ही खळबळजनक घटना आज, 17 जूनला सकाळी घडली. अपहृत मुलगी 10 वीत शिकते. ती दोन दिवसांपासून सकाळी 11 वाजता …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दहावीचे पेपर सबमिट करण्यासाठी गेलेली 15 वर्षीय मुलगी घरी परतलीच नाही. तिच्‍या आईने शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून तिला कुणीतरी पळवले असल्याचा संशय व्‍यक्‍त करत तक्रार दिली आहे. बालाजी फैल भागात ही खळबळजनक घटना आज, 17 जूनला सकाळी घडली.

अपहृत मुलगी 10 वीत शिकते. ती दोन दिवसांपासून सकाळी 11 वाजता मैत्रिणीसह शाळेत पेपर सबमिट करण्यास जाते व 12 वाजता घरी परत येते. आजही ती शाळेत पेपर सबमिट करण्यासाठी घरून आईला सांगून मैत्रिणीसह गेली. मात्र दुपारी 1 वाजेपर्यंतही ती परतली नाही. तिच्‍या आईने शाळेत जाऊन पाहिले; मात्र तिथे कुणीही हजर दिसले नाही. मुली शाळेतून निघून गेल्याचे कळल्‍याने त्‍यांनी मुलीच्‍या मैत्रिणीकडे चौकशी केली तेव्हा तिच्‍या मैत्रिणीने सांगितले, की गांधी चौकापर्यंत आम्‍ही सोबत आलो.

तिने मेडिकलवर औषध घेण्यासाठी थांबली. त्‍यानंतर ती घरी परतलीच नाही. मुलीच्‍या आईने तातडीने ही बाब पतीला सांगितली. मुलीचा मोबाइलही बंद येत आहे. नातेवाइक, मित्रमंडळीकडे शोध घेऊनही ती आढळली नाही. उंची 5 फूट, अंगात काळा टी शर्ट, अंगात पांढरा स्टोल, पांढरी जिन्स, पायात काळी सँडल, रंग सावळा, केस लांब असे तिचे वर्णन आहे. तिला कुणीतरी पळवून नेल्याचा संशय त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक श्रीकृष्ण डांगे करत आहेत.