अल्पवयीन मुलीला पळवून नेले…पोलिसांनी पुण्यातून दोघांना आणले..!; 21 वर्षीय युवकाला अटक

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरातील अल्पवयीन मुलीला शहरातीलच 21 वर्षीय युवकाने पळवून नेले होते. पोलिसांनी दोघांचा युद्धपातळीवर शोध घेत पुण्यातून पकडून आणले. शेगाव येथील संगम नगर परिसरात राहणाऱ्या नागेश सुरेश गावंडे याने २० फेब्रुवारी २०२१ रोजी शहरातीलच अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. त्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी शेगाव शहर …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरातील अल्पवयीन मुलीला शहरातीलच 21 वर्षीय युवकाने पळवून नेले होते. पोलिसांनी दोघांचा युद्धपातळीवर शोध घेत पुण्यातून पकडून आणले.

शेगाव येथील संगम नगर परिसरात राहणाऱ्या नागेश सुरेश गावंडे याने २० फेब्रुवारी २०२१ रोजी शहरातीलच अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. त्‍याची तक्रार मुलीच्या वडिलांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नागेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेगाव पोलीस आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की तो मुलीसह पुण्याला राहत आहे. या माहितीवरून ठाणेदार संतोष टाले यांनी पीएसआय नितीन इंगोले व पोलीस पथकाला पुणे येथे रवाना केले. सापळा रचून नागेशला मुलीसह ताब्‍यात घेण्यात आले. त्‍याला अटक करून काल, ५ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती.