अल्पवयीन मुलीला 22 वर्षीय तरुणाने पळवले, मलकापुरातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अल्पवयीन मुलीला 22 वर्षीय तरुणाने पळवून नेल्याची घटना मलकापूरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी तिच्या वडिलांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वासुदेव बाबुलाल पाटील (22, रा. चैतन्यवाडी, मलकापूर) असे मुलीला पळवून नेणाऱ्याचे नाव आहे. त्याने 10 मे रोजी सायंकाळी सात नळगंगानगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेले. 5 फूट …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अल्पवयीन मुलीला 22 वर्षीय तरुणाने पळवून नेल्याची घटना मलकापूरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी तिच्‍या वडिलांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

वासुदेव बाबुलाल पाटील (22, रा. चैतन्यवाडी, मलकापूर) असे मुलीला पळवून नेणाऱ्याचे नाव आहे. त्‍याने 10 मे रोजी सायंकाळी सात नळगंगानगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेले. 5 फूट उंच, रंग गोरा, बांधा मध्यम, केस लांब, चेहरा लांबट, अंगात काळा टॉप, लेंगिंग अशा वर्णनाची मुलगी कुणाला आढळल्‍यास मलकापूर शहर पोलिसांशी संपर्क करावा. मुलीच्‍या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी वासुदेवविरुद्ध गुन्‍हा दाखल करून दोघांचा शोध सुरू केला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक श्रीमती म्हसाये करत आहेत.