अल्पवयीन मुलीवर ५४ वर्षांचा व्‍यक्‍ती करायचा लैंगिक अत्‍याचार, आई करायची दूर्लक्ष…!; मेहकर तालुक्‍यातील धक्‍कादायक घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव साकर्षा (ता. मेहकर) येथील १६ वर्षीय मुलीला २५ वर्षीय तरुणाने पळवून नेले होते. दोघांना जानेफळ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तरुणाला अटक तर मुलीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. तिने २ जुलैला बाल न्यायमंडळासमोर दिलेल्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली. तिच्यावर गावातीलच ५४ वर्षीय व्यक्ती घरी येऊन वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देऊळगाव साकर्षा (ता. मेहकर) येथील १६ वर्षीय मुलीला २५ वर्षीय तरुणाने पळवून नेले होते. दोघांना जानेफळ पोलिसांनी ताब्‍यात घेतल्यानंतर तरुणाला अटक तर मुलीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. तिने २ जुलैला बाल न्यायमंडळासमोर दिलेल्या जबाबातून धक्‍कादायक माहिती समोर आली. तिच्‍यावर गावातीलच ५४ वर्षीय व्‍यक्‍ती घरी येऊन वारंवार लैंगिक अत्‍याचार करत होता. तिने ही बाब आईला सांगूनही तिने दूर्लक्ष केले. त्‍यामुळे पोलिसांनी या व्‍यक्‍तीविरुद्ध आणि तिच्‍या आईविरुद्ध गुन्‍हा दाखल करत त्‍यांना अटक केली.

नंदकिशोर लोळू हरमकार (२५, रा. सावरगाव) याने पीडित मुलीला पळवून नेले होते. २८ मे रोजी या प्रकरणात तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन पकडून आणले. त्‍यानंतर हरमकार याला अटक करण्यात आली होती. मुलीला बालसुधारगृहात ठेवले. २ जुलै रोजी बालन्याय मंडळासमोर तिने जबाब दिला. त्यात तिने आई आणि घराशेजारी राहणाऱ्या ५४ वर्षीय नंदू बजरंग गायकवाड याचे नाव घेतले. गायकवाड हा घरी येऊन वारंवार तिच्यावर लैंगिक अत्‍याचार करत होता. आईला (४८) सांगूनही ती त्‍याच्‍या कृत्‍याकडे दूर्लक्ष करत होती. त्‍यामुळे पोलिसांनी गायकवाडसह तिच्‍या आईला काल, ७ जुलैला अटक केली. गायकवाडला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. तर पीडितेच्‍या आईची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. आरोपी नंदकिशोर गायकवाड रेशन दुकान चालवत असल्याचे समजते. तपास ठाणेदार राहुल गोंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक श्री. काकडे करत आहेत.