अल्‍पवयीन मुलीवर पळवून नेत लैंगिक अत्‍याचार; 25 वर्षीय तरुणाला खामगावमध्ये अटक

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार खामगाव शहरात समोर आला आहे. या प्रकरणी 25 वर्षीय तरुणाला खामगाव शहर पोलिसांनी आज अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले, की महाकाल चौक परिसरातील रहिवासी असलेल्या 15 वर्षीय मुलीला सिव्हिल लाइन भागातील शिवशंकर रामदास सरोदे याने पळवून …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अल्‍पवयीन मुलीला प्रेमाच्‍या जाळ्यात अडकवून पळवून नेत तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार करण्यात आल्याचा प्रकार खामगाव शहरात समोर आला आहे. या प्रकरणी 25 वर्षीय तरुणाला खामगाव शहर पोलिसांनी आज अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी सांगितले, की महाकाल चौक परिसरातील रहिवासी असलेल्या 15 वर्षीय मुलीला सिव्हिल लाइन भागातील शिवशंकर रामदास सरोदे याने पळवून नेले होते. या प्रकरणी मुलीच्‍या आईने खामगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन शिवशंकरने मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली होती. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला होता. दरम्‍यान मुलगी घरी परतली. पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार झाल्याचे समोर आले. शिवशंकरने तिच्‍यासोबत जबरदस्‍ती शारीरिक संबंध ठेवल्याचे मुलीने सांगितले. त्‍यावरून पोलिसांनी अपहरणाच्‍या गुन्ह्यात वाढ करून शिवशंकरविरुद्ध लैंगिक अत्‍याचाराचा गुन्‍हा दाखल केला. त्‍याला अटक केली आहे.