अल्‍पवयीन मुलीवर सावत्र पित्‍याची वाईट नजर; रात्री जवळ झोपून नको ते करायचा…; शेगाव शहरातील धक्‍कादायक घटना; नराधमाच्‍या मुसक्‍या आवळल्‍या

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अल्पवयीन मुलीवर वाईट नजर ठेवून तिची छेड काढणाऱ्या सावत्र पित्याच्या मुसक्या शेगाव पोलिसांनी आवळल्या आहेत. हा नराधम घरात एकटी पाहून तिची छेड काढायचा. रात्री तिच्याजवळ जाऊन झोपून त्याने नको ते कृत्य केले. अखेर कंटाळून तिच्या आईने तिला आत्याकडे राहायला पाठवले. पण आज, 25 फेब्रुवारीला सकाळी त्याने तिला …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अल्‍पवयीन मुलीवर वाईट नजर ठेवून तिची छेड काढणाऱ्या सावत्र पित्‍याच्‍या मुसक्‍या शेगाव पोलिसांनी आवळल्‍या आहेत. हा नराधम घरात एकटी पाहून तिची छेड काढायचा. रात्री तिच्‍याजवळ जाऊन झोपून त्‍याने नको ते कृत्‍य केले. अखेर कंटाळून तिच्‍या आईने तिला आत्‍याकडे राहायला पाठवले. पण आज, 25 फेब्रुवारीला सकाळी त्‍याने तिला भररस्‍त्‍यात अडवून घरी चल अन्यथा माझ्याइतके कुणी वाईट नाही म्‍हणून छेड काढली. अखेर धाडसाने युवतीने शेगाव पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली.

सूत्रांच्‍या माहितीनुसार, शेगाव शहराच्‍या मध्यवर्ती भागात ही 16 वर्षीय पीडित मुलगी राहते. तिचे वडील विहिरीत पडून मरण पावले आहेत. तिच्‍या आईने 51 वर्षीय या नराधमासोबत दुसरे लग्‍न केले. मात्र या नराधमाची या मुलीवर वाईट नजर पडली. एक वर्षापूर्वी घरी एकटी असताना त्‍याने तिची छेड काढली. भीतीपोटी तिने आईला ही बाब सांगितली नाही. त्‍यामुळे त्‍याची हिंमत वाढत गेली. पीडिता घरी एकटी थांबायची नाही. आरोपीसमोर यायलाही घाबरायची. 3 महिन्‍यांपूर्वी मुलगी झोपली असताना हा सावत्र बाप तिच्‍याजवळ जाऊन झोपला व छातीवर हात फिरवू लागला. मुलीने विरोध करत आईला ही बाब सांगितली. त्‍यामुळे तिच्या आईने तिला शहरातच आत्‍याकडे राहायला पाठवले होते. आज, 25 फेब्रुवारीला सकाळी साडेनऊच्‍या सुमारास ती गांधी चौकाकडून जोगडी फैलकडे जात असताना नराधमाने तिला अडवले. तू घरी चल अन्यथा माझ्याइतका कुणी वाईट नाही, असे म्‍हणून तिला धमकावले व रस्‍त्‍यातच तिची छेड काढली. तिने घरी येऊन आत्‍याला ही बाब सांगताच आत्‍याने तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्‍हा दाखल करून नराधम सावत्र पित्‍याला अटक केली आहे. तपास ठाणेदार संतोष टाले यांच्‍या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्री. दंदे एनपीसी उमेश बोरसे करत आहेत.