अल्‍पावधीत ‘बुलडाणा लाइव्‍ह’ने जिंकली जिल्हावासियांची मने; श्रीमंत योगी पुरवणी प्रसिद्ध करून अनोखे अभिवादन : माजी आमदार डॉ. खेडेकर यांचे गौरवोद्‌गार; जिजाऊ जन्‍मस्‍थळावर प्रकाशन

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एवढ्या कमी वेळात बुलडाणा लाइव्हने जिल्हावासियांची मने जिंकली आहे, ही बाब वाखाणण्याजोगी आहे. विश्वासाहर्ता आणि बातम्यांतील ताजेपणा असाच जीवंत ठेवून त्यांनी वाटचाल करावी. आज बुलडाणा लाइव्हने शिवजयंतीनिमित्त श्रीमंत योगी ही विशेष पुरवणी प्रसिद्ध करून शिवरायांना अनोखे अभिवादन केले, असे गौरवोद्गार सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी काढले. बुलडाणा लाइव्हतर्फे आज सकाळी ११ …
 

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एवढ्या कमी वेळात बुलडाणा लाइव्‍हने जिल्हावासियांची मने जिंकली आहे, ही बाब वाखाणण्याजोगी आहे. विश्वासाहर्ता आणि बातम्‍यांतील ताजेपणा असाच जीवंत ठेवून त्‍यांनी वाटचाल करावी. आज बुलडाणा लाइव्‍हने शिवजयंतीनिमित्त श्रीमंत योगी ही विशेष पुरवणी प्रसिद्ध करून शिवरायांना अनोखे अभिवादन केले, असे गौरवोद्‌गार सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी काढले.

बुलडाणा लाइव्‍हतर्फे आज सकाळी ११ वाजता श्रीमंत योगी या विशेष पुरवणीचे प्रकाशन श्री. खेडेकर यांच्‍या हस्‍ते सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्‍मस्‍थळावर करण्यात आले. त्‍यावेळी श्री. खेडेकर बोलत होते. तत्‍पूर्वी श्री. खेडेकर यांच्‍यासह मान्‍यवरांनी जिजाऊ जन्‍मस्‍थळाचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या मूर्तीचे पूजन केले. यावेळी नगराध्यक्ष सतीशभाऊ तायडे, शिवसेना तालुकाप्रमुख शिवप्रसाद ठाकरे, दीपकभाऊ बोरकर, राजेंद्र आढाव, बाळूभाऊ जाधव, बालाजी मेहेत्रे, बुलडाणा लाइव्‍हचे सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी बाळासाहेब भोसले यांची उपस्‍थिती होती. कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. सर्वच मान्‍यवरांनी पुरवणतील मजकूर अत्‍यंत दर्जेदार आणि शिवरायांचे विचार अत्‍यंत भावस्‍पर्शी पद्धतीने मांडण्यात आल्याचे सांगून कौतुक केले.