अवैधरित्या गोंद काढून वाहतूक; तिघांना पकडले, 6 फरारी; जळगाव जामोद तालुक्यात कारवाई

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील राखीव वनातून अवैधरित्या सलाई गोंद काढून वाहतूक करणार्या तिघांना वनविभागाने आज ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 21 हजार रुपयांचा 210 किलो गोंद जप्त केला आहे. आरोपींत कृष्णा तुळशीराम बारकल (21, रा.कुंवरदेव, ता. जळगाव जामोद), अनिल सुकलाल जमरा (21, रा. कुंवरदेव ता. जळगाव जामोद), …
 

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील राखीव वनातून अवैधरित्या सलाई गोंद काढून वाहतूक करणार्‍या तिघांना वनविभागाने आज ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 21 हजार रुपयांचा 210 किलो गोंद जप्त केला आहे. आरोपींत कृष्णा तुळशीराम बारकल (21, रा.कुंवरदेव, ता. जळगाव जामोद), अनिल सुकलाल जमरा (21, रा. कुंवरदेव ता. जळगाव जामोद), कैलास राजू (19, रा. कुंवरदेव ता. जळगाव जामोद) यांचा समावेश असून, त्यांचे 6 साथीदार फरारी झाले आहेत. आरोपींविरुद्ध वनविभागाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.