अवैधरित्या रेल्वेचे तात्काळ तिकीट बनवून विकायचा; सायबर कॅफेचालकाला अटक

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैधरित्या रेल्वेचे तात्काळ ई- तिकिट बनवून विकणार्या सायबर कॅफेचालकाला रेल्वे सुरक्षाबलाच्या पथकाने सुरक्षा शेगाव येथे छापा मारून अटक केली आहे. त्याच्याकडून रोख रकमेसह संगणक व साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई आज, 21 जानेवारीला सकाळी करण्यात आली.रेल्वे तिकिटातील काळाबाजार करणार्या अवैध दलालांवर रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैधरित्या रेल्वेचे तात्काळ ई- तिकिट बनवून विकणार्‍या सायबर कॅफेचालकाला रेल्वे सुरक्षाबलाच्या पथकाने सुरक्षा शेगाव येथे छापा मारून अटक केली आहे. त्याच्याकडून रोख रकमेसह संगणक व साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई आज, 21 जानेवारीला सकाळी करण्यात आली.
रेल्वे तिकिटातील काळाबाजार करणार्‍या अवैध दलालांवर रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यात बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील तीन ठिकाणी अवैधरित्या रेल्वेचे इ- तिकीट व तात्काळ तिकीट बनवून विकले जात असल्याची माहिती रेल्वेच्या सुरक्षा विभाग भुसावळला मिळाल्यावरून पथकाने चौकशीस सुरुवात केली होती. यात शेगाव येथील भगवान बाबा सायबर कॅफेवरून अवैधरित्या रेल्वेचे तिकिट बनविले जात असल्याचे आयपी अ‍ॅड्रेसवरून समजले. यानंतर सुरक्षा पथकाने सापळा रचून आज सकाळी कॅफेवर धाड टाकून तिकीट बनविण्यासाठी वापरले जाणारे संगणक व साहित्य जप्त करून कॅफेचालकाला ताब्यात घेऊन भुसावळला घेऊन गेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.