अवैध गुटख्याविरोधात ‘एलसीबी’ची जिल्हाभर धडक मोहीम…मलकापूर, खामगाव, अमडापूर, देऊळगाव राजामध्ये तब्‍बल 1 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्‍त, 5 जणांना रंगेहात पकडले!!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने काल आणि आज, 15 व 16 मार्चला जिल्हाभर अवैध गुटखा विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवली. मोहिमेत तब्बल 1 लाख 96 हजार 796 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, 5 जणांना रंगेहात पकडत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. अवैध गुटखाविक्रीविरोधात मोहीम राबविण्याचे आदेश एलसीबीला कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने काल आणि आज, 15 व 16 मार्चला जिल्हाभर अवैध गुटखा विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवली. मोहिमेत तब्‍बल 1 लाख 96 हजार 796 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला असून, 5 जणांना रंगेहात पकडत त्‍यांच्‍यावर कारवाई करण्यात आली.

अवैध गुटखाविक्रीविरोधात मोहीम राबविण्याचे आदेश एलसीबीला कर्तव्‍यदक्ष जिल्‍हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी दिले होते.  त्‍यानुसार पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांनी विशेष पथके नेमली. या पथकांनी दोन दिवस जोरदार कारवाई करत गुटखा माफियांवर वचक बसवला आहे.

  • कारवाई पहिली ः अमडापूर ते जानेफळ रोडवर गणेश सुभाष अक्‍कर (37. रा. जानेफळ, रा. मेहकर) यांना पकडून त्‍याच्‍याकडून गुटख्याची 60 पाकिटे (किंमत 9700 रुपये) व दुचाकी (किंमत 55 हजार) असा एकूण 64700 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला.
  • कारवाई दुसरी ः मलकापूर शहरातील आठवडे बाजारात प्रवीण अशोक रणित (33, रा. शिवाजीनगर, मलकापूर) याला पकडून 40588 रुपयांचा गुटखा जप्‍त केला.
  • कारवाई तिसरी ः देऊळगाव राजा शहरातील बसस्‍थानक चौकात मनोज रामस्‍वरुप बोहरा (48, रा. शनिवार पेठ, देऊळगाव राजा) याला पकडत त्‍याच्‍याकडून 2520 रुपयांचा गुटखा जप्‍त केला.
  • कारवाई चौथी ः खामगाव शहरातील आठवडे बाजारात पंकज हिरालाल सतवाणी (33, रा. अमृतबाग तलाव, खामगाव) याला पकडून 61, 785 रुपयांचा गुटखा जप्‍त केला.
  • कारवाई पाचवी ः खामगाव शहरातील आठवडे बाजारातच अनिल अमरचंद पवार (29. रा. मौची गल्ली, खामगाव) याला पकडून 29, 723 रुपयांचा गुटखा जप्‍त केला.

ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरिक्षक प्रदीप आढाव, पोलीस अंमलदार शेषराव अंभोरे, शे. साजीद, सय्यद हारुण, अत्ताउल्ला खान, श्री. चांदूरकर, गिता बामंदे, सुनील खरात, दीपक पवार, गजानन आहेर, पंकज मेहर, सुभाष वाघमारे सुरेश भिसे, नीलेश वाकडे यांनी पार पाडली.