अवैध धंद्यांविरोधात नागरिकांची एकजूट; सिंदखेड राजा पोलीस ठाण्यावर धडक

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः सिंदखेड राजा शहरातील जिजामातानगरात दारू विक्री, जुगार, मटका असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. युवा पिढीही यात ओढली जात आहे. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी एकत्र येत आज, 7 जूनला पोलीस ठाणे गाठून ठाणेदारांना निवेदन दिले. निवेदनाची दखल घेतली नाही तर आंदोलन उभारू, असा इशाराही …
 

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः सिंदखेड राजा शहरातील जिजामातानगरात दारू विक्री, जुगार, मटका असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. युवा पिढीही यात ओढली जात आहे. त्‍यामुळे संतप्‍त रहिवाशांनी एकत्र येत आज, 7 जूनला पोलीस ठाणे गाठून ठाणेदारांना निवेदन दिले. निवेदनाची दखल घेतली नाही तर आंदोलन उभारू, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. अवैध धंदेवाईक आणि त्‍यांच्‍याकडे येणाऱ्या लोकांमुळे महिलांची कुचंबना होत आहे. अनेकांचे संसार यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. तरुण पिढीदेखील व्यसनाधीन झाली आहे, असे निवेदनात म्‍हटले आहे. निवेदनावर शेकडो नागरिकांची सह्या आहेत.