अवैध रेती उपसा; जेसीबी मालकाला पावणे आठ लाख दंड; जेसीबी जप्त; संग्रामपूर तालुक्यात कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ-रूधाणा रस्त्यावरील बेंबळा नदी पात्रातून विना परवाना रेती उपसा करणार्या जेसीबी मालकाला 7 लाख 82 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. जेसीबी मशीन आणि रेती गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई परिविक्षाधीन तहसीलदार तेजश्री कोरे यांनी 11 फेब्रुवारीला रात्री 8 च्या दरम्यान केली.गणेश बाजोड (रा. रुधाना, ता. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ-रूधाणा रस्त्यावरील बेंबळा नदी पात्रातून विना परवाना रेती उपसा करणार्‍या जेसीबी मालकाला 7 लाख 82 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. जेसीबी मशीन आणि रेती गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई परिविक्षाधीन तहसीलदार तेजश्री कोरे यांनी 11 फेब्रुवारीला रात्री 8 च्या दरम्यान केली.
गणेश बाजोड (रा. रुधाना, ता. संग्रामपूर) असे जेसीबी मालकाचे नाव आहे. बेंबळा नदीपात्रात अवैध रेती उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रात्री 8 वाजता तहसीलदार तेजश्री कोरे यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने धाड टाकली. त्यावेळी अवैध रेती उपसा करणारी जेसीबी मशीन ताब्यात घेण्यात आली. तिथे एक ट्रॅक्टरही होते. ते घेऊन चालक पसार झाला. पलायन केलेले ट्रॅक्टर चांगेफळ येथील असल्याची माहिती जेसीबी चालक योगेश डामरे याने दिली. त्याच्या जबाबानुसार मालक बाजोड याला दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई तहसीलदार तेजश्री कोरे, नायब तहसीलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार डॉ. वराडे, तलाठी रंगदळ, तलाठी डाबरे आदींनी केली.