अवैध रेती वाहतुकीचे टिप्पर उलटले; 4 मजूर जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, चालक फरारी, शेगाव तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैधरित्या रेती वाहतूक करणारे भरधाव टिप्पर उलटून 4 मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना काल, 13 जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील दादगाव- ईसापूर मार्गावर घडली. याप्रकरणी आज, 14 जूनला पहाटे जलंब पोलीस ठाण्यात घटनास्थळावरून फरार झालेला टिप्पर चालक दशरथ ठाकरे (रा. वाघुड, ता. मलकापूर) याच्याविरोधात गुन्हा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैधरित्या रेती वाहतूक करणारे भरधाव टिप्पर उलटून 4 मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना काल, 13 जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील दादगाव- ईसापूर मार्गावर घडली. याप्रकरणी आज, 14 जूनला पहाटे जलंब पोलीस ठाण्यात घटनास्थळावरून फरार झालेला टिप्पर चालक दशरथ ठाकरे (रा. वाघुड, ता. मलकापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दादगाव- ईसापूर मार्गावर काल रात्री साडेदहाच्या सुमारास अशोक लेलँड कंपनीचे टिप्पर (एमएच 21 एक्स 4421) उलटले. यात टिप्परमध्ये बसलेले मजूर भिकनशाह रहीम शाह (21, सलमान खाँ अय्युब खाँ (21), समीर शाह रहीमशाह (18), सोहेल शाह मुनाफ शाह(19, सर्व रा. मुस्तकअलीनगर ,मलकापूर) गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच जलंब पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक धीरज बांडे, पोहेकाँ श्री. इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्‍णवाहिकेतून उपचारासाठी खामगावच्‍या सरकारी रुग्‍णालयात हलवले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.