अवैध रेती वाहतुकीचे 3 ट्रॅक्‍टर एलसीबीने पकडले; नांदुरा तालुक्‍यात साडेतेरा लाखांची कारवाई

नांदुरा (प्रवीण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ज्ञानगंगा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल, 10 एप्रिलच्या पहाटे खातखेडा (ता. नांदुरा) शिवारात पकडले. खातखेडा शिवारातून अवैध रेती वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मिळाली होती. या माहितीच्या आधारे …
 

नांदुरा (प्रवीण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ज्ञानगंगा नदीच्‍या पात्रातून अवैधरित्‍या रेती उपसा करून वाहतूक करणारे 3 ट्रॅक्‍टर बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने काल, 10 एप्रिलच्‍या पहाटे खातखेडा (ता. नांदुरा) शिवारात पकडले.

खातखेडा शिवारातून अवैध रेती वाळू  उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेला (एलसीबी) मिळाली होती. या माहितीच्‍या आधारे एलसीबीच्‍या पथकाने सापळा रचला. यात तीन ट्रॅक्टरसह तीन ब्रास रेती व रेती भरण्याचे साहित्य असा 13 लाख 60 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. यावेळी प्रकाश तुकाराम जावरे (42, रा. मोतीपुरा, नांदुरा), शेख रहीम शेख जमा (32, रा. गबीनगर नांदुरा), पंजाबराव देवचंद तायडे (40, रा. धानोरा ता.नांदुरा) यांना घटनास्‍थळावरून ताब्‍यात घेतले. ट्रॅक्टरचे मूळ मालक असलेले जग्गू पठाण (रा. नांदुरा खुर्द, ता. नांदुरा), सय्यद अमीर सय्यद रसूल (रा. नांदुरा खुर्द, ता. नांदुरा), भरत बाळू चोपडे (रा. कोळंबा रसलपूर ता. नांदुरा) यांच्‍याविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला. तिन्‍ही ट्रॅक्‍टरवर दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदारांना लेखी पत्र देण्यात आले आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्‍पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर  पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्‍या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्‍या आदेशाने एपीआय नागेश कुमार चतरकर, पीएसआय नीलेश शेळके, नापोकाँ रघुनाथ जाधव, नापोकाँ दीपक पवार, पोकाँ नदीम शेख, पोकाँ विजय सोनवणे, चालक पोकाँ राहुल बोर्डे यांनी केली.