अवैध लॉटरी सेंटरवर छापा मारून 6 जणांच्‍या आवळल्‍या मुसक्‍या!; बुलडाणा शहरातील कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ःबुलडाणा शहरात सुरु असलेल्या दोन अवैध लॉटरी सेंटरवर छापा मारून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने 6 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 3 एप्रिलच्या सायंकाळी आठवडे बाजार परिसरात करण्यात आली. 6 जणांना ऑनलाइन लॉटरी खेळताना रंगेहात पकडण्यात आले. यात शिवलाल बोन्द्रे (31, रा. गजानननगर, बुलडाणा), …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ःबुलडाणा शहरात सुरु असलेल्या दोन अवैध लॉटरी सेंटरवर छापा मारून बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने 6 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 3 एप्रिलच्या सायंकाळी आठवडे बाजार परिसरात करण्यात आली.

6 जणांना ऑनलाइन लॉटरी खेळताना रंगेहात पकडण्यात आले. यात शिवलाल बोन्द्रे (31, रा. गजानननगर, बुलडाणा), जबीर शेख सब्बीर शेख (36, रा. जौहरनगर, बुलडाणा), प्रदीप भीमराव गवई (30, रा. मिलिंदनगर, बुलडाणा), अजय बबन जाधव (24, क्रांतीनगर, बुलडाणा), आकाश सुरेश खेडकर (30, रा. शिवाजीनगर, बुलडाणा), देवधन पंढरीनाथ गवळी (30, शांतीनिकेतननगर, बुलडाणा) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून दोन अवैध लॉटरी मशीन व इतर जुगार साहित्य असा एकूण 1 लाख 50 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक नागेशकुमार चतरकर, पोलीस उपनिरिक्षक नीलेश शेळके, श्रीकांत जिदमवार, पोहेकाँ श्रीकृष्ण चांदूरकर, विलास काकड, पो.ना. गजानन आहेर, पो.ना. दीपक पवार, पो.ना. लक्ष्मण कटक, पो.काँ. केदार फाळके, दीपक वायाळ, सुभाष वाघमारे, चालक पो.काँ. संजय मिसाळ यांनी पार पाडली.