असाही आदर्श… लग्‍नाच्‍या वाढदिवसानिमित्त नागरे दाम्‍पत्‍याची कोविड रुग्‍णालयाला तर रक्षाविसर्जनावरील खर्च टाळून गिरी कुटुंबाची सीएम फंडात 11 हजारांची मदत

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिक्षक जगन्नाथ नागरे व त्यांच्या पत्नी सौ. रेखा यांनी लग्नाचा २५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत 11 हजार रुपयांचा धनादेश देऊळगाव राजा येथील कोविड सेंटरला मदत म्हणून दिला. वैद्यकीय अधिकारी डॉ. आस्मा यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला. यावेळी डॉ. राजमाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सदाशिव मुंढे, …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  शिक्षक जगन्नाथ नागरे व त्यांच्या पत्नी सौ. रेखा यांनी लग्नाचा २५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत 11 हजार रुपयांचा धनादेश देऊळगाव राजा येथील कोविड सेंटरला मदत म्‍हणून दिला. वैद्यकीय अधिकारी डॉ. आस्मा यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला. यावेळी डॉ. राजमाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सदाशिव मुंढे, त्यांचा मुलगा ऋषी नागरे आदी उपस्थित होते.

गिरी परिवाराची सामाजिक बांधिलकी

चिखली तालुक्यातील चांधई येथील सोमवारगिर गिरी महाराजांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झाले. गावात व परिसरात ते धार्मिक कार्ये पार पाडत. कीर्तन करत. प्रत्‍येक समाज कार्यात त्‍यांचा सहभाग असे. त्यांच्या या सेवाभावी संस्काराचा, विचारांचा वारसा पुढे नेत परिवारातील सदस्यांनी गिरी महाराजांच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशी पुढील कार्यक्रमावर कोणताही अतिरिक्त खर्च न करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 11 हजारांची मदत केली. मदतीचा धनादेश शिवसेना नेते नंदू कर्‍हाडे यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर धनादेश चिखलीचे तहसीदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये हा धनादेश जमा करण्यात आला आहे. यावेळी युवा सेना तालुका प्रमुख नंदु कर्‍हाडे, शिवसेना शहर संघटक प्रितम गैची, सरपंच सुनिल रगड, पप्पु परिहार उपस्थित होते.