अस्वल मृतावस्‍थेत आढळले, नखे गायब असल्याने संशय वाढला!; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यातील महाकाली धबधब्याच्या परिसरात 24 मे रोजी मादी अस्वल मृतावस्थेत आढळले. ही बाब भिंगारा 2 च्या वनरक्षकाला गस्त घालताना लक्षात येताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. 8 ते 10 दिवसांपूर्वी या अस्वलाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मात्र अस्वलाच्या हाताची नखे गायब असल्याने यामागे वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्यांचा तर …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्‍यातील महाकाली धबधब्‍याच्‍या परिसरात 24 मे रोजी मादी अस्वल मृतावस्‍थेत आढळले. ही बाब भिंगारा 2 च्‍या वनरक्षकाला गस्‍त घालताना लक्षात येताच त्‍यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. 8 ते 10 दिवसांपूर्वी या अस्वलाचा मृत्‍यू झाल्याची शक्‍यता आहे. मात्र अस्वलाच्‍या हाताची नखे गायब असल्याने यामागे वन्यप्राण्यांच्‍या अवयवांची तस्‍करी करणाऱ्यांचा तर हात नाही ना, अशी चर्चा तालुक्‍यात होत आहे.

अस्वल कुजलेल्या अवस्‍थेत दिसून आले. त्‍याचे वय 7-8 वर्षे होते. त्‍याची उत्तरीय तपासणी करून वनविभागाकडून दहनविधी करण्यात आला. ते नैसर्गिकरित्‍या मृत्‍यू पावल्याचे स्‍पष्टीकरण वनविभागाकडून देण्यात आले आहे. तपास उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, सहायक वनसंरक्षक आर. आर. गायकवाड यांच्‍या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचारी करत आहेत.