आंबेडकर म्हणतात, अजित पवार हे तर खोटारडे मंत्री

वीजबिल माफीच्या मुद्यावर शब्द न पाळल्याचा आरोपसोलापूर : वंचित विकास बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर वीजबिलाच्या मुद्यावरून जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अजित पवार हे खोटारडे मंत्री असलचा आरोप करताना वीजबिल माफी/ सवलतीचा शब्द त्यांनी पाळलेला नाही. तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थकीत वीजबिल माफ करण्याचा …
 

वीजबिल माफीच्या मुद्यावर शब्द न पाळल्याचा आरोप
सोलापूर :
वंचित विकास बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर वीजबिलाच्या मुद्यावरून जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अजित पवार हे खोटारडे मंत्री असलचा आरोप करताना वीजबिल माफी/ सवलतीचा शब्द त्यांनी पाळलेला नाही. तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थकीत वीजबिल माफ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळात सादर केला. परंतु अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे कारण देत तो मंजूर केला नाही. त्यामुळे आगामी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या खोटारड्या मंत्र्याला धडा शिकवावा, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन अ‍ॅड. आंबेडकर यांनी मतदारांना केले आहे. सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी वीजबिलाच्या मुद्यावर महाविकास आघाडीच्या कोणत्याही मंत्र्यासोबत आपण कोणत्याही मैदानावर जाहीर चर्चा करण्यास आपण तयार आहोत. कोरोनाचे भांडवल करून आघाडी सरकारने राज्यातील वीजेचे दर दुप्पट करून जनतेवर बोजा टाकला, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.