आई कुणाला काही न सांगता निघून गेली..; मुलांची शोधाशोध सुरू

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः 60 वर्षीय महिला घरातून कोणाला काही न सांगता निघून गेली आहे. ही घटना 6 जुलै रोजी समोर आली. आठवडे बाजार भागातील रहिवासी गं.भा. कमल डिगंबर गुळवे या काही दिवसांपासून आजारी आहेत. 6 जुलै रोजी कमलबाई या घरी कोणालाही काही न सांगता निघून गेल्या. त्या परत आल्याच नाहीत. त्यांचा …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः 60 वर्षीय महिला घरातून कोणाला काही न सांगता निघून गेली आहे. ही घटना 6 जुलै रोजी समोर आली.

आठवडे बाजार भागातील रहिवासी गं.भा. कमल डिगंबर गुळवे या काही दिवसांपासून आजारी आहेत. 6 जुलै रोजी कमलबाई या घरी कोणालाही काही न सांगता निघून गेल्या. त्या परत आल्याच नाहीत. त्यांचा नातेवाईकांकडे व परिसरात शोध घेतला असता त्या कुठेही मिळून आल्या नाहीत, अशी तक्रार त्यांचा मुलगा सुनील गुळवे यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिली. त्‍यावरून शहर पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे. कमलबाई गुळवे यांची उंची 5.3 इंच, रंग – गोरा, अंगात ऑरेंज साडी, लाल ब्लाउज, केस काळे, गळ्याला उजव्या बाजूने गाठ आहे. अशा वर्णनाची महिला आढळल्यास शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा मुलगा सुनील गुळवे यांच्‍याशी मो. 9922390580 /आनंद गुळवे मो. 9766180823 संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.