आई-वडिलांविना पोरक्या मुलीवर चुलत मामाची पडली वाईट नजर!; दुसरबीड येथील माणुसकीला काळीमा फासणारी घटना

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आई-वडील मरण पावल्याने मामाच्या घरी राहणार्या मुलीचा चुलत मामाने विनयभंग केल्याची घटना दुसरबीड (ता. सिंदखेड राजा) येथे समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून किनगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी 25 जानेवारीला घरात एकटीच असताना चुलत मामाने येऊन तिचा वाईट उद्देशाने विनयभंग करत जीवे मारण्याची …
 

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आई-वडील मरण पावल्याने मामाच्या घरी राहणार्‍या मुलीचा चुलत मामाने विनयभंग केल्याची घटना दुसरबीड (ता. सिंदखेड राजा) येथे समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून किनगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी 25 जानेवारीला घरात एकटीच असताना चुलत मामाने येऊन तिचा वाईट उद्देशाने विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तपास ठाणेेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अशोक चाटे, पोकाँ शिवाजी बारगजे करत आहेत.