आई-वडिलांसह चिखलीला आलेल्या सख्ख्या बहिणींचे बाजारातून अपहरण!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली येथे आई- वडिलांसोबत आलेल्या दोन मुली गायब झाल्याची घटना 3 मार्च रोजी घडली. याप्रकरणी काल, 4 मार्चला चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे एका मुलीचे वय 16 तर दुसरीचे वय 10 वर्षे आहे. काही दिवसांपासून त्या सैलानी येथे आई- …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली येथे आई- वडिलांसोबत आलेल्या दोन मुली गायब झाल्याची घटना 3 मार्च रोजी घडली. याप्रकरणी काल, 4 मार्चला चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे

एका मुलीचे वय 16 तर दुसरीचे वय 10 वर्षे आहे. काही दिवसांपासून त्या सैलानी येथे आई- वडिलांसह वास्तव्यास होत्या. 3 मार्च रोजी आई-वडिलांसह चिखली येथे काही कामासाठी आल्या होत्या. मात्र चिखलीत पोहचल्यानंतर त्या अचानक गायब झाल्या. दोन्ही मुली सख्ख्या बहिणी असून, हे कुटुंब मूळचे गोंदिया जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी मुलींचे वडील अली जान सय्यद यांनी चिखली पोलिसांत तक्रार दिली आहे.तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही मुली अत्यंत गरीब कुटूंबातील असून, त्या परिवारासह सैलानी येथे भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असल्याचे कळते.