आकाशवाणीतर्फे प्रश्नमंजुषा स्पर्धा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आकाशवाणीने प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाच्या बाबींविषयी समाजात औत्सुक्य निर्माण व्हावे, ऐतिहासिक स्मृतींना उजाळा मिळावा आणि समाज मनात त्याचे स्थान कायम रहावे या उद्देशाने ज्ञान प्रबोधनासाठी ही स्पर्धा 16 ऑगस्टपासून होत आहे. स्पर्धेत आकाशवाणीच्या बातमीपत्रातून दर सोमवारी एक प्रश्न विचारला जाणार आहे. स्पर्धकांनी …
 
आकाशवाणीतर्फे प्रश्नमंजुषा स्पर्धा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भारतीय स्वातंत्र्याच्‍या अमृत महोत्सवानिमित्त आकाशवाणीने प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाच्या बाबींविषयी समाजात औत्‍सुक्य निर्माण व्हावे, ऐतिहासिक स्मृतींना उजाळा मिळावा आणि समाज मनात त्याचे स्थान कायम रहावे या उद्देशाने ज्ञान प्रबोधनासाठी ही स्पर्धा 16 ऑगस्टपासून होत आहे. स्पर्धेत आकाशवाणीच्या बातमीपत्रातून दर सोमवारी एक प्रश्न विचारला जाणार आहे. स्पर्धकांनी या प्रश्नाचे उत्तर आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडे quiz75news@gmail.com या ईमेलद्वारे पाठवायचे आहे. सर्वप्रथम योग्य उत्तर देणाऱ्या यशस्वी स्पर्धकाचे नाव शुक्रवारच्या बातमीपत्रातून प्रसारीत करण्यात येणार आहे. आकाशवाणीच्या सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्मवरही फोटोसह विजेत्या स्पर्धकाचे नाव प्रकाशित करण्यात येईल. तसेच प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आकाशवाणी, मुंबईच्या वृत्त विभागप्रमुख सरस्वती कुवळेकर यांनी केले आहे.