आकाशात ’हवेत’ संबंध करणे जोडप्यास पडले महागात

पॅराशूट न उघडल्याने बॉयफ्रेंड आदळला जमिनीवर लंडन : जगावेगळे काही तरी करण्याच्या नादात काही मंडळी काय करतील याचा नेम नसतो. पण कधीकधी असे नसते धाडस महागात पडते,जीवावरही बेतू शकते. ब्रिटनमधील एका जोडप्यास प्रचिती आली. अर्थात त्यांचे हे धाडस त्यांना केवळ नाक आणि काही हाडे मोडून किरकोळ जखमी होण्यावर निभावले. ब्रिटनमध्ये एका स्काय डायव्हिंग करणार्या जोडप्याने …
 

पॅराशूट न उघडल्याने बॉयफ्रेंड आदळला जमिनीवर

लंडन : जगावेगळे काही तरी करण्याच्या नादात काही मंडळी काय करतील याचा नेम नसतो. पण कधीकधी असे नसते धाडस महागात पडते,जीवावरही बेतू शकते. ब्रिटनमधील एका जोडप्यास प्रचिती आली. अर्थात त्यांचे हे धाडस त्यांना केवळ नाक आणि काही हाडे मोडून किरकोळ जखमी होण्यावर निभावले. ब्रिटनमध्ये एका स्काय डायव्हिंग करणार्‍या जोडप्याने हवेत ’संबंध’ करण्याचा जोर आला. त्यांनी तो अचाट प्रयोग यशस्वीदेखील केला. पण प्रयोग शेवटाला जाताना थोडी गडबड झाली. जोडप्यातील पुरुष पॅराशूट उघडायला विसरला. हा प्रकार लक्षात आला तोवर उशीर झाला होता आणि तो धाडकन जमिनीवर आदळला होता. यात नाकाला आणि पाठीला जखम झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
ब्रिटनमधील लेस्ली आणि विल्यम हे स्काय डायव्हिंगसह वेगवेगळे साहसी थरार (अ‍ॅडव्हेन्चर) करत असतात. यातील लेस्ली ही संबंधमध्ये फारच अ‍ॅक्टिव्ह असते व त्यात ती दरवेळी काही तरी नाविन्यपूर्ण प्रयोग करते. यात तिला तिचा जोडीदार विल्यम्स हाही प्रेरणा देत असतो. या दोघांनी स्काय डायव्हिंग करण्याचे ठरवले. पण तिथेही लेस्लीचे डोके भलतीकडेच चालले. तिला हवेत संबंध करण्याची कल्पना सुचली. ती तिने विल्यमला ऐकवली. तो तर तयारच होता. स्कायडायव्हिंग करण्यासाठी हे जोडपे विमानातून रवाना झाले. वाटते उत्तेजनासाठी त्यांचे किसिंगबिसिंग सुरूच होते. स्कायडायव्हिंगसाठी उडी घेतल्यानंतर त्यांनी हवेत संबंध सुरू केले. काही वेळ रोमान्स करत ते जोडपे ’हवेत’च होते. संबंध करून झाल्यावर हे जोडे हळूहळू जमिनीकडे येऊ लागले. पण विल्यम्स त्याचे पॅराशूट उघडायचेच विसरून गेला. अगदी शेवटच्या क्षणी ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. पण तोवर उशीर झाला होता.कारण लेस्ली यशस्वीरित्या जमिनीवर उतरली. पण विल्यम्स थोड्या उंचीवरून जमिनीवर आदळला. त्यात त्याचे नाक तुटले व बराच मुका मार लागला जखमाही झाल्या. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करावे लागले. जीवावर आलेले धाडस थोडक्यात वाचले. पण हा अनुभव थ्रिलींग होता, असे या जोडप्याचे म्हणणे आहे. तुम्हाला अशी काही कल्पना सुचत असेल तर ती तुम्ही तुमच्या रिस्कवरच पूर्ण करा, असेच आमचे सांगणे आहे.