आगीचे तांडव! हत्ता येथे दोन घरे भस्‍मसात, सहा लाखांचे नुकसान

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन घरांना आग लागून 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना हत्ता (ता. लोणार) येथे 22 फेब्रुवारीच्या दुपारी घडली.विद्याबाई राठोड (45), नीलेश राठोड (35) यांची घरे आगीत खाक झाली आहेत. विद्याबाई शेतात गेल्या होत्या तर नीलेशसुद्धा कामानिमित्त बाहेर होते. त्यामुळे आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. वेळीच आग लागल्याचे लक्षात न …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दोन घरांना आग लागून 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना हत्ता (ता. लोणार) येथे 22 फेब्रुवारीच्‍या दुपारी घडली.
विद्याबाई राठोड (45), नीलेश राठोड (35) यांची घरे आगीत खाक झाली आहेत. विद्याबाई शेतात गेल्या होत्‍या तर नीलेशसुद्धा कामानिमित्त बाहेर होते. त्‍यामुळे आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. वेळीच आग लागल्याचे लक्षात न आल्याने आगीने रौद्ररूप धारण करत दोन्‍ही घरे भस्‍मसात केली. आगीची माहिती मिळताच लोणार अग्‍निशमन दलाच्‍या पथकाने तातडीने हत्ता येथे धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मंडळ अधिकारी श्री. नागरे, तलाठी श्री. साळवे यांनी घटनास्‍थळाचा पंचनामा केला. श्रीमती राठोड यांच्‍या घरातील सोयाबीन, तूर, गहू, हरभरा, कपाटातील रोख रक्‍कम व दागिने असे एकूण 3 लाख 98 हजार रुपयांचे नुकसान झाले तर नीलेश राठोड यांच्‍या घरातील सोयाबीन, तूर, हरभरासह संसारोपयोगी साहित्‍य जळून खाक झाले. त्‍यांचे एकूण 2 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले.