आग लागली विझवा, पळापळा… अवघ्या गावाचे शर्थीचे प्रयत्‍न!; पण ना वाचला गोठा, ना चारा, शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्यातील गोळेगाव बुद्रूक येथे आज, 1 एप्रिलला दुपारी तीनच्या सुमारास शॉट सर्किटमुळे गावालगतच्या गोठ्याला आग लागली. शेगाव येथून अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यात अपयश आले. गोठा आणि त्यातील चारा खाक झाला आहे. यात सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  शेगाव तालुक्यातील गोळेगाव बुद्रूक येथे आज,  1 एप्रिलला दुपारी तीनच्‍या सुमारास शॉट सर्किटमुळे गावालगतच्‍या गोठ्याला आग लागली. शेगाव येथून अग्‍निशमन दलाचा बंब येईपर्यंत शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्‍न केले. मात्र त्‍यात अपयश आले. गोठा आणि त्‍यातील चारा खाक झाला आहे. यात सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

गावातील बागायती शेतकरी धम्मपाल समदूर, वामन सिरसाट यांनी आग विझविण्यासाठी मोटार चालू करून पाणी पुरवले. ग्रामस्‍थांनीही मोठी धावपळ केली. आगीत रामकृष्ण गावंडे यांचा गोठा आणि चारा जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्‍या जवान आल्यानंतर त्‍यांनी पूर्णपणे आग विझवली. यावेळी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्‍थळी आले होते. तहसील कर्मचारी, पटवारी श्री. मालोकार, ग्रामसेवक व्ही. डी. वैराळ, पोलीस पाटील मधुसूदन तायडे, सरपंच रघुनाथ मापारी घटनास्थळी दाखल झाले होते.