आजपासून पुढील ४ दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस; दमदार पावसाची “प्रतीक्षा’च; पावसाअभावी पिके करपली

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऐन फुलांमध्ये आलेली पिके करपून जात आहेत. मात्र आज, ११ ऑगस्टपासून पुढील ४ दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळेल. दमदार पावसासाठी मात्र अजून ४ ते ५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार …
 
आजपासून पुढील ४ दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस; दमदार पावसाची “प्रतीक्षा’च; पावसाअभावी पिके करपली

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऐन फुलांमध्ये आलेली पिके करपून जात आहेत. मात्र आज, ११ ऑगस्टपासून पुढील ४ दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळेल.

दमदार पावसासाठी मात्र अजून ४ ते ५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या आठवड्यापासून घाटाखाली व घाटावर दोन्हीकडे पावसाचा खंड पडला. त्यामुळे सोयाबीनसह इतर पिकांवर चक्रीभुंग्याच्या किड्याने आक्रमण केले होते. अनेक ठिकाणी पावसाअभावी पिके करपून जात होती. त्यामुळे सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मोटारद्वारे पिकांना पाणी देणे सुरू केले होते. बुलडाणा कृषी हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात ११ ते १४ ऑगस्टपर्यंत तुरळक ठिकाणीच हलका पाऊस पडेल. त्यानंतर १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात सर्वदूर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.