आजवर ८६ हजार ४७० रुग्‍णांनी दिली कोरोनाला धोबीपछाड!; नव्या १७ रुग्‍णांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 15 जुलैला नव्या 17 कोरोनाबाधितांची भर पडली. 18 रुग्ण दिवसभरात बरे झाले असून, सध्या रुग्णालयात अवघे 36 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे, असे म्हणता येईल.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2419 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2402 अहवाल कोरोना …
 
आजवर ८६ हजार ४७० रुग्‍णांनी दिली कोरोनाला धोबीपछाड!; नव्या १७ रुग्‍णांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 15 जुलैला नव्या 17 कोरोनाबाधितांची भर पडली. 18 रुग्‍ण दिवसभरात बरे झाले असून, सध्या रुग्‍णालयात अवघे 36 रुग्ण उपचार घेत आहेत. त्‍यामुळे जिल्हा कोरोनामुक्‍तीच्‍या वाटेवर आहे, असे म्‍हणता येईल.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2419 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2402 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 17 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 10 व रॅपीड टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 855 तर रॅपिड टेस्टमधील 1547 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली तालुका : बेराळा 2, मेहकर शहर : 2, बुलडाणा शहर :1, शेगाव शहर : 2, खामगाव शहर : 2, खामगाव तालुका : घाटपुरी 1, जळगाव जामोद तालुका : मडाखेड 2, देऊळगाव राजा तालुका : अंढेरा 2, डोढ्रा 1, सिंदखेड राजा शहर : 1, लोणार तालुका : टिटवी 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 17 रुग्ण आढळले आहेत.

36 रुग्णांवर उपचार सुरू
आज 18 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 609980 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86470 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1711 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87172 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 36 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 666 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.